पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मिळालेला विजय हा सर्वसामान्य जनतेने मिळवून दिल्याचे सांगत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. यासोबतच पश्चिम बंगाल हे राज्य भ्रष्टाचार मुक्त राज्य असल्याच गर्व वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर यश मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन प.बंगालमधील जनतेचे आभार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, आमच्या विरोधात गेल्या दोन वर्षात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले. मात्र जनतेने त्या प्रचाराला नाकारत आम्हाला विजय मिळवून दिला. राज्यात जनतेची दिशाभूल करण्याचा आणि त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेने शांततेत मतदान केले. पश्चिम बंगाल हे देशातील भ्रष्टाचार मुक्त राज्य असल्याचा मला गर्व वाटतो, असा दावा देखील ममता यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा