पश्चिम बंगालमध्ये रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कल हाती आला असून त्रिशंकू लढाईत तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. दार्जिलिंग आणि कालिम्पाँग वगळता प्रत्येक जिल्ह्यात तृणमूलने विजय मिळवला आहे. तर, राज्यात तृणमूलनंतर भाजपा क्रमांक दोनचा पक्ष झाला आहे. डावे आणि काँग्रेस आघाडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून भाजपा सज्ज झाला आहे.

बिनविरोध निवडणुकीतही तृणमूलचा विजय

शनिवारी ८ जुलै रोजी पश्चिम बंगालच्या ७३ हजार ८८७ ग्रामपंचायत जागांपैकी ६४ हजार ८७४ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. उरलेल्या ९ हजार १२ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. या बिनविरोध निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ८ हजार ८७४ जागांवर तृणमूल काँग्रेसचा (TMC) विजय झाला आहे.

security tightened in manipur following fresh violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
fresh attack in manipur
Manipur Violence : वृद्ध नागरिकाच्या हत्येनंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना; दोन सशस्र गटातील गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
number of people coming to Congress from other parties has increased
केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत, पण नागपुरात ‘इनकमिंग’ काँग्रेसमध्ये!
massive protest in kolkata demanding resignation of cm mamata banerjee
पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाने तणाव; डॉक्टर प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसासह आंदोलक जखमी
sanjay gaikwad statement on badlapur case
Sanjay Gaikwad : “आता काय मुख्यमंत्री शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का?”, बदलापूर घटनेवरील आरोपाला उत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान!
Appa Shinde Kalyan East area Kalsevadi drug shop stolen by thieves
कल्याणमध्ये माजी आमदाराच्या औषध विक्री दुकानात चोरी
upper tehsil office, Mohol taluka,
तहसील कार्यालयाच्या वादात शिंदे-अजितदादा गटात जुंपली, भाजपचे ‘नरो वा कुंजरो’

मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत आलेल्या निकालानुसार, TMC ने एकूण ६३ हजार २२९ पैकी २९ हजार ६६५ ग्रामपंचायतीच्या जागांवर विजय मिळवला आहे. भाजप ८ हजार २१, सीपीएम २ हजार ४७२ आणि काँग्रेस २ हजार ९४ जागांवर विजयी ठरले आहेत.

सुरुवातीला मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यांमध्ये काँग्रेस आणि सीपीआय यांची युती आघाडीवर होती. जानेवारीत झालेल्या मुर्शिदाबाद सागरदिघी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यामुळे येथील ग्रामपंचायतही काँग्रेसच मिळवेल अशी अपेक्षा होती. परंतु, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, टीएमसी दोन्ही जिल्ह्यांमध्ये विरोधकांच्या पुढे होती.

इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) बंगालमध्ये नव्याने उदयास येत असून या पक्षाने भांगर मतदारसंघात चांगली कामगिरी केली आहे. ISF ने CPI(M) आणि भूसंपादन विरोधी समितीसोबत युती करून भांगरच्या काही ब्लॉक्समध्ये TMC विरोधात कडवी झुंज दिली. याच भागात मतदानावेळी हिंसाचार घडला होता.

पंचायत समिती निवडणुकीतही तृणमूल काँग्रेस विजयी

पंचायत समित्यांमध्ये, तृणमूलने रात्री १० वाजेपर्यंत ९ हजार ७४० जागांपैकी २ हजार १५५ जागा जिंकल्या आहेत. भाजपने २१४ पंचायत समित्या जिंकल्या, तर डाव्या आघाडीला ४७ आणि काँग्रेसला ३८ जागा मिळाल्या आहेत. अपक्ष उमेदवारांनी ५८ जागा जिंकल्या असून काहींचे निकाल अजूनही हाती आलेले नाहीत. रात्री १० वाजेपर्यंत राज्यभरातील एकूण ३४१ पंचायत समित्यांपैकी पैकी १२९ जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. भाजपला ९ आणि डाव्या आघाडीला ३ जागा मिळाल्या आहेत.

जिल्हा परिषदेतही तृणमूलचा झेंडा

ग्रामपंचायत, पंचायत समितीसह जिल्हा परिषदेतही तृणमूलच पुढे आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत ९२८ जाागांपैकी ७७ जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. भाजपा १० जागांवर आघाडीवर आहे, तर सीपीआय (एम) ५ जागांवर विजयी झाली असून काही जागांचा निकाल येणे बाकी आहे.