आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना नुकतीच पश्चिम बंगालमध्ये समोर आली आहे. या आईने चक्क आपल्या चार वर्षांच्या मुलीच्या डोक्याचा भाग कापून ते मांस खाताना नातेवाईकांनी तिला पकडल्याची माहिती स्थानिक पोलीसांनी दिली आहे. नातेवाईकांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे या लहान मुलीचा जीव वाचला. येथील गोपाळपूर या गावात हा प्रकार घडला आहे. गावात राहणाऱ्या 42वर्षीय प्रमिला मोंडल या महिलेने आपल्याच मुलीचे मांस खाण्याचे घृणास्पद कृत्य करताना तिच्या नातेवाईकांनी बघितले आणि या सगळ्याची माहिती गावकऱ्यांना दिली. प्रमिला आमच्या बाजुच्याच घरात राहते. जेव्हा आम्ही घरात प्रवेश केला तेव्हा आम्हाला लहानग्या भारतीच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर आम्ही समोरचे दृश्य बघून हादरल्याची माहिती प्रमिलाच्या नातेवाईकांनी दिली. प्रमिला लहानग्या भारतीला मांडीवर बसवून तिच्या डोक्याचे मांस खात होती. या सगळ्याने हादरलेल्या नातेवाईकांनी प्रथम भारतीला प्रमिलाच्या तावडीतून सोडवून जवळच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर या सगळ्याची माहिती गावकऱ्यांना समजल्यानंतर सर्वजण प्रमिलाच्या घरी आले आणि तिला असे करण्याचे कारण विचारले. मात्र तिने काही सांगण्यास नकार दिला. मात्र, गावकऱ्यांच्या मते प्रमिला मोंडल हिला अनेक व्यसने असून तिने बुधवारी दुपारी दारूचे सेवन केले होते. प्रमिलाला पार्वती आणि भारती या दोन मुली आणि एक मुलगा असून यापूर्वीही तिने अशाप्रकारची कृत्ये केल्याची माहिती पोलीसांना गावकऱ्यांकडून मिळाली आहे. पोलीसांनी प्रमिलाला सध्या ताब्यात घेतले असून सरकारी डॉक्टरांकडून चौकशी सुरू आहे. प्रमिलाच्या घरची परिस्थिती हालाखीची असली तरी तिने भुकेसाठी हे कृत्य केलेले नाही. कदाचित मानसिक व्याधीमुळे तिने असे केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

kolkata-pics1

 

 

 

 

स्वत:च्याच मुलीला खाण्याचा प्रयत्न करणारी प्रमिला मोंडल.

Story img Loader