Kannad Speaking In Bengaluru : सोशल मीडियावर कन्नड भाषेबाबत एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक आणि परराज्यातील लोक याबाबत चर्चा सुरू झाली आहे. एक्सवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये, “उत्तर भारतासाठी बंगळुरू बंद आहे”, असे लिहिण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये, एका युजरने म्हटले आहे की, “ज्यांना कन्नड शिकायची नाही अशा उत्तर भारत आणि शेजारील राज्यांसाठी बंगळुरू बंद आहे. जर ते भाषा आणि संस्कृतीचा आदर करू शकत नसतील तर त्यांना बंगळुरूला त्यांची गरज नाही.”

दरम्यान ही पोस्ट करणाऱ्या युजरचे नाव बब्रुवाहन (@Paarmatma) असे असून, त्याच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्याने २३ जानेवारी २०२५ रोजी केलेल्या या पोस्टला आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

…तेव्हा खूप वाईट वाटते

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, बेंगळुरूला स्थलांतरित झाल्याचा दावा करणाऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “ही पोस्ट थोडी कठोर वाटू शकते. पण मी पाहतो की, बंगळुरूमधील लोक कन्नड भाषेला आदिवासी भाषा असल्यासारखे पूर्णपणे दुर्लक्षित करतात. अनेक कॉर्पोरेट कार्यालयांमध्येही कन्नड बोलणाऱ्यांना तुच्छ लेखतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. कन्नड ही एक समृद्ध भाषा आहे, आणि या भाषेला साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्कारांसह सर्वाधिक साहित्यिक पुरस्कार मिळाले आहेत.”

हस्यास्पद

दरम्यान काही ‘एक्स’ युजर्सनी या पोस्टवर व्यंग्यात्मक टीकाही केली आहे. एकाने व्यंग्यात्मकपणे म्हटले की, “कन्नड भाषेचा वापर करायला सांगताना इंग्रजीत लिहिणे किती हस्यास्पद आहे.” तर, दुसऱ्या युजरने आर्थिक परिणामांबद्दल इशारा देत म्हटले की, “जर हा तर्क लागू केला तर बंगळुरूतील आयटी कंपन्या दुसरीकडे जातील आणि बंगळुरूला त्याचे नुकसान सहन करावे लागेल.”

लाज वाटते की…

यावेळी पोस्टवर नाराजी व्यक्त करत एका व्यक्तीने वेगळा दृष्टिकोन व्यक्त केला आणि म्हटले की, बंगळुरू आज इतर राज्यातील मेहनती लोकांमुळे अस्तित्वात आहे, ज्यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. हा व्यक्ती म्हणाला की, “आज, बंगळुरू जे काही आहे, ते इतर राज्यातील मेहनती लोकांमुळे आहे. याच लोकांनी या शहराचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. हे विसरू नका! आता सर्व विकास झाला असताना, तुम्हाला इतरांनी निघून जावे असे वाटते का? लाज वाटते की, या प्रकरणावर कन्नड लोक आणि कर्नाटक सरकारला शांत बसले आहे.”

Live Updates