बंगळुरूतील डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया करून एका माणसाच्या डोक्यात अडकलेली गोळी काढली आहे. ही गोळी १८ वर्षांपासून त्या माणसाच्या डोक्यात अडकली होती. ही गोळी तीन सेंटीमीटर लांबीची होती. गेल्या आठवड्यात बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून ही गोळी काढण्यात आली. गोळीने झालेल्या दुखापतीमुळे २९ वर्षीय सालेह (बदलेलं नाव) बहिरे झाले होते. गोळी त्यांच्या डाव्या कानाजवळ अडकली होती. या गोळीमुळे बहिरेपणासह त्यांना तीव्र डोकेदुखी होत होती. तसेच कानातून सतत पू वाहत होता. आता त्यांची या त्रासापासून सुटका झाली आहे.

सालेह हे त्यांचे सहा भाऊ आणि तीन बहिणींबरोबर येमेनमधल्या एका छोट्या गावात लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती. घराजवळच त्यांची शेती होती. या शेतात ते कांदा, टोमॅटो, बटाटा, लसूण आणि गाजर पिकवत होते. लहान असताना ते नेहमी शेताला पाणी देणे, खतफवारणी करण्यासारखी कामं करायचे. सालेह एक दिवस काहीतरी साहित्य खरेदी करायला दुकानात गेले होते. दुकानातून घरी जात असताना वाटेत घडलेल्या एका घटनेने त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं.

kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
operation tumor Iraq girl, oral tumor Iraq girl,
मुंबई : दहा वर्षांच्या इराकी मुलीवर तोंडाच्या ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया!
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
TB survey in Satara, 160 teams for TB survey ,
साताऱ्यात क्षयरुग्ण सर्वेक्षणासाठी १६० पथके
Illegal drug stock worth 25 lakhs seized in Lonar
खळबळजनक! लोणार येथे २५ लाखांचा अवैध औषधसाठा जप्त; कामोत्तेजक, गर्भपात…
Trainee pilot girl died, Trainee pilot girl organ donation ,
प्रशिक्षणार्थी वैमानिक तरुणीमुळे सहा जणांना जीवदान

सालेह यांनी एका व्हिडीओ कॉलदरम्यान टीओआयला सांगितलं की, मी दुकानातून घरी येत असताना वाटेत दोन गटांमध्ये हाणामारी चालू होती. या हाणामारीदरम्यान, लोकांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी मला लागली. खूप रक्त आलं मग लोकांनी मला रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी केवळ जखम स्वच्छ केली, वरून मलमपट्टी केली. परंतु, त्यांनी गोळी काढली नाही. कारण गोळी कानात घुसून पुढे कवटीत अडकली होती. कानात एक जखमी झाली होती जी बरी होत नव्हती. त्यामुळे कानातून पू वाहत होता. सतत डोकेदुखी होत होती.

सालेह यांना त्यांच्या काही मित्रांकडून बंगळुरूतल्या एका रुग्णालयाची माहिती मिळाली. त्यानंतर ते खूप अपेक्षांसह बंगळुरूत दाखल झाले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की, ही शस्त्रक्रिया खूप अवघड आहे. त्यानंतर ते अ‍ॅस्टर रुग्णालयाच्या ईएनटी विभागाचे आणि क्वालिफायर इम्प्लांट सर्जरीचे प्रमुख सल्लागार डॉ. रोहित उदय प्रसाद यांना भेटले. डॉक्टर म्हणाले, गोळी तिथून काढल्यावर खूप रक्तस्राव होईल.

हे ही वाचा >> आधी विवस्त्र केलं, मग खांबाला बांधलं अन्…; मुलाच्या प्रेमाची शिक्षा आईला, घृणास्पद कृत्य वाचून तुम्हीही हादराल!

दरम्यान, सालेह आणि डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्याचं धाडस केलं. या शस्त्रक्रियेनंतर सालेह यांचं दुखणं कमी झालं आहे. तसेच त्यांना डाव्या कानाने काही प्रमाणात ऐकू येतंय. त्याचबरोबर कानातून पू निघणं बंद झालं आहे. सालेह या शस्त्रक्रियेनंतर येमेनला परत गेले आहेत. कानातली गोळी त्यांनी घेतली होती, परंतु, विमानतळावर या गोळीमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ती गोळी तिथेच टाकून दिली.

Story img Loader