Bengaluru Woman Jumps From Auto Rickshaw : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये गुरुवारी मध्यरात्री (२ जानेवारी) एक थरकाप उडवणारी घटना घडली असून, मद्यपान केलेल्या ड्रायवरने रिक्षा चुकीच्या दिशेने वळवल्यानंतर ३० वर्षांच्या तरुणीने, धावत्या रिक्षातूनच उडी मारली. ड्रायव्हर रिक्षा अनोळखी ठिकाणी घेऊन निघाल्याचे लक्षात येताच तरुणीने हा धाडसी निर्णय घेतला. दरम्यान या घटनेमध्ये तरुणीला किरकोळ दुखापत झाली आहे.

या तरुणीने होरामावूहून थानिसांद्र येथील तिच्या घरी जाण्यासाठी नम्मा यात्री ॲपद्वारे रिक्षा बुक केली होती. थोडे अंतर गेल्यानंतर ड्रायव्हर मार्ग बदलल्याचे लक्षात आल्यानंतर तिने रिक्षा थांबवण्यास सांगितले. वारंवार सांगूनही, ड्रायव्हरने याकडे दुर्लक्ष केल्याने तरुणीने धावत्या रिक्षातूनच उडी मारली. यानंतर ड्रायव्हर पुन्हा रिक्षात बसण्यासाठी मागे लागला. पण, तरुणीने रिक्षाचे भाडे ऑनलाइन पद्धीतेने भरले आणि दुसरी रिक्षा बुक केली.

Rajasthan Woman Anita Chaudhary Murder
Rajasthan Woman Murder: दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले सहा तुकडे, आरोपी गुल मोहम्मदचा शोध सुरू
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’
Rohit Sharma Statement After Being Retained by Mumbai Indians for less than what Jasprit Bumrah and Hardik Pandya got
Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO
Agra Mubarak Manzil
Agra Mubarak Manzil : आग्र्यातील ‘औरंगजेब हवेली’ बिल्डरकडून जमीनदोस्त; पुरातत्व खात्याचे निर्देश धाब्यावर
Cyber Fraud Accused Arrested
Cyber Fraud: अमेरिकेतील मॉडेल असल्याचे भासवून ७०० महिलांची डेटिंग ॲपवरून फसवणूक; दिवसा नोकरी, रात्री भुरटेगिरी, असा पकडला आरोपी
Vande Bharat sleeper
Vande Bharat Sleeper Train Video : वंदे भारत स्लीपर ट्रेनने गाठला १८० किलोमीटर प्रतितास वेग; चाचणीचा Video आला समोर
alcohol
Alcohol Causes Cancer : मद्यपानामुळे कर्करोगाचा धोका? अमेरिकेतील डॉक्टरांच्या अहवालाने मद्यप्रेमींना दिला सावधानतेचा इशारा

एक्स पोस्टमुळे प्रकरण आले समोर

पीडित तरुणीने अधिकृतपणे या घटनेची तक्रार दाखल केली नाही. मात्र, तिचा पती अझहर खान यांनी बेंगळुरू शहर पोलिसांना टॅग करत एक्सवर हा भयानक प्रकार सांगितला. घटनेच्या वेळी चालक नशेत होता, असा दावा अझहर खांन यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

या घटनेची अधिकृतपणे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नसली तरी, खान यांच्या एक्स पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले. त्याचबरोबर पोलिसांनी, निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी विनंतीही केली आहे.

पीडित तरुणीचा पती अझहर खान यांनी एक्सवर केलेल्या पोस्टखाली आणखी युजर्सनी त्यांना रिक्षातून प्रवास करताना आलेले वाईट अनुभव शेअर केले आहेत.

हे ही वाचा : जो बायडेन यांच्या पत्नीला का वापरता येणार नाही पंतप्रधान मोदींनी दिलेली सर्वात महागडी भेटवस्तू, जाणून घ्या नेमकं कारण

‘नम्मा यात्री’कडून दखल

दरम्यान बंगळुरू शहर पोलिसांनी अझहर खान यांच्या एक्स पोस्टची दखल घेतली असून, त्यांना आरोपीचा संपर्क क्रमांक आणि रिक्षाचा तपशील देण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे नम्मा यात्री ॲपने अझहर खान यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हटले की, “अझहर, या प्रकरणाबाबत पोलीस व आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही या रिक्षा ड्रायव्हरवर कारवाई करत आमच्या प्लॅटफॉर्मवरून त्याचे खाते तत्काळ निलंबित केले आहे. तुम्हाला आणखी काही मदत हवी असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.”

Story img Loader