HMPV Virus India : चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमीत तपासणीदरम्यान किमान दोन एचएमपीव्हीचे रूग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान या संसर्गासंबंधी केंद्र सरकारने काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारतातील या व्हायरससंबंधी परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. या दोनही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.

vinay hiremath post (1)
Vinay Hiremath: “खूप श्रीमंत झालोय, पण आता या आयुष्याचं करू काय?”, ८ हजार कोटींना कंपनी विकणाऱ्या विनय हिरेमठ यांच्यासमोर यक्षप्रश्न!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
hmpv virus symptoms marathi
HMPV विषाणूची लक्षणं काय? लागण झाल्यास उपाय काय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ…
Ramesh Bidhuri vs cm atishi marlena
Ramesh Bidhuri: ‘तिने तर बापच बदलला’, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यानंतर भाजपा नेते रमेश बिधुरींचे मुख्यमंत्री आतिशींबाबत अश्लाघ्य विधान
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”

भारतात एचएमव्हीपी संसर्ग हा बॅप्टिस्ट हॉस्पिटल-बेंगळुरूमधील एका तीन महिन्याच्या मुलीला आणि आठ महिन्याच्या मुलाला झाल्याचे आढळून आले आहे. दोन्ही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली होती, त्यानंतर सध्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असून मुलावर उपचार केले जात आहेत आणि तो बरा होत आहे.

इतकी काळजी का घेतली जातेय?

आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त मॉनिटरिंग ग्रुप तयार केला होता. हा गट जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी चिनमधील परिस्थितीबद्दल माहिती घेत आहे. हिवाळ्याच्या दिवसात जगभरातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या श्वसनासंबंधीत संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या घटना समोर येतात. असे असले तरी चीनच्या आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान संयुक्त मॉनिटरिंग गट चीनमध्ये पसरत असलेल्या या आजारासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेकडून सातत्याने अपडेट मागवत आहे.

आपल्याला एचएमपीव्ही बद्दल काय माहिती आहे?

कोविड-१९ साथीच्या आजारासाठी कारणीभूत व्हायरस हा आपल्यासाठी अज्ञात होता. पण एचएमपीव्ही हा आपल्याला माहिती असलेला विषाणू संसर्ग आहे. या विषाणूमुळेच अंदाजे १२ टक्के संक्रमणे होतात. हा विषाणू रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस (RSV) सारखाच आहे, जे की साधारणपणे आढळून येणारे श्वसनासंबंधी व्हायरल संक्रमण आहे. २००१ मध्ये नेदरलँड्समधील २८ मुलांमध्ये एचएमपीव्ही पहिल्यांदा आढळून आला होता. हे एव्हीयन मेटाप्युमोव्हायरसचा (Avian Metapneumovirus) पुढील प्रकार असून यामुळे विविध पक्ष्यांमध्ये विविध लक्षणे दिसून येतात.

हेही वाचा>> HMPV विषाणूची लक्षणं काय? लागण झाल्यास उपाय काय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ…

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची (HMPV) लक्षणे काय आहेत?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे, जो न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटाप्युमोव्हायरस वंशातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा याचा शोध लावला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. मुलांच्या नमुन्यांचा अभ्यास करताना या विषाणूचा शोध लागला होता. संशोधन असे सूचित करते की, हा विषाणू किमान सहा दशकांपासून प्रसारित आहे आणि आता जागतिक स्तरावर प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना बाहेर काढलेल्या श्वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातून किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कातूनदेखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. चीनी सीडीडी वेबसाइट सांगते की, ‘एचएमपीव्ही’साठी संसर्ग कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो. हा विषाणू हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत जास्त प्रमाणात आढळतो.

हेही वाचा>> HMPV Virus India : भारतात आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, करोनानंतर आता नव्या साथीची भीती?

दरम्यान या विषाणूंमुळे आपण नेहमी पाहतो तशी श्वसनासंबंधी संक्रमण होऊ शकतात. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून वेगवेगळ्या इन्फ्लूएंझा विषाणूंसह RSV यासारख्या श्वसनासंबंधीत संसर्गाचा डेटा गोळा केला जातो. या डेटानुसार, गेल्या महिन्यात, इन्फ्लूएंझा बी व्हिक्टोरिया वंश आणि RSV हे आढळून आलेल्या श्वसन संक्रमणाचे मुख्य कारण होते.

Story img Loader