Mahalakshmi Murder Case : बंगळुरु या ठिकाणी श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहण्यास मिळालं. २१ सप्टेंबरला एका घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली. ज्यानंतर शेजाऱ्यांनी या घरात राहणाऱ्या महालक्ष्मीच्या आई आणि बहिणीला ही माहिती दिली. त्यांनी घरी येऊन पाहिलं तेव्हा त्या घरात सगळीकडे किडे झाले होते. तसंच फ्रिजमध्ये महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे ( Bengaluru Murder ) होते. या प्रकरणाला एक नवं वळण लागलं आहे. कारण संशयित आरोपीचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे. तसंच या मृतदेहाबरोबर जी सुसाइड नोट आढळली त्यात गुन्ह्याची कबुली देण्यात आली आहे.

फ्रिजमध्ये ठेवण्यात आला महालक्ष्मीचा मृतदेह

महालक्ष्मीची हत्या ( Mahalakshmi Murder Case ) झाल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तिच्याच घरातल्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. या प्रकरणात मुक्तीरंजन प्रताप राय हा प्रमुख संशयित होता. मात्र याच मुक्तीरंजनचा मृतदेह भुईनपूर गावात आढळून आला. २१ सप्टेंबर या दिवशी महालक्ष्मीच्या मृतदेहाचे ( Mahalakshmi Murder Case) तुकडे तिच्याच घरातल्या फ्रिजमध्ये आढळले आणि तिची हत्या झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकं तयार केली होती. मुक्तीरंजन राय हाच या प्रकरणातला संशयित आहे या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले होते.

Counselling Different behaviors by mother with two sisters
समुपदेशन : आईकडून बहिणींमध्ये दुजाभाव?
25th September Rashi Bhavishya & Panchang
२५ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य: ग्रहमानाच्या साथीने दिवस…
Bengaluru Mahalaxmi Murder body stored in fridge
Bengaluru Women Murder: बंगळुरूतील ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; पीडितेच्या पतीनं प्रियकर अश्रफवर व्यक्त केला संशय
Bengaluru Mahalaxmi Murder Updates in Marathi
Bengaluru Murder : “फ्रिजमध्ये माझ्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पाहिले आणि…”, बंगळुरुत हत्या झालेल्या महालक्ष्मीच्या आईने काय सांगितलं?
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Girls, hotel room, meet friend, High Court,
मुलींनो, मित्राला भेटायला थेट हॉटेलच्या खोलीत जाऊ नका.. उच्च न्यायालयाचा सल्ला!
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
minor girl sexually assaulted in west bengal
West Bengal Crime : संतापजनक! पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार; बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर आढळली

हे पण वाचा- Bengaluru: ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; महालक्ष्मीच्या पतीनं कोणावर व्यक्त केला संशय?

मुक्तीरंजन रायच्या सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं आहे?

“मला महालक्ष्मी खूप आवडत होती. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. मात्र ती माझ्याशी अजिबात नीट वागत नव्हती. महालक्ष्मी मला अपहरणाच्या प्रकरणात अडकवू पाहात होती. मी तिच्यासाठी खूप पैसे खर्च केले. मात्र तिला माझी कदर नव्हती. त्यामुळे मी तिची हत्या केली.” असं मुक्तीरंजनने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

२ किंवा ३ सप्टेंबरला महालक्ष्मीची हत्या

पोलििसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरु या ठिकाणी २१ सप्टेंबरला एका इमारतीतल्या एका घरातून वास येऊ लागला. महालक्ष्मी नावाच्या महिलेचा मृतदेह २० हून अधिक तुकडे केलेल्या अवस्थेत फ्रिजमध्ये ( Mahalakshmi Murder Case ) ठेवण्यात आला होता. महालक्ष्मीची हत्या २ किंवा ३ सप्टेंबरला झाली असावी असं पोलिसांनी म्हटलं आहे. मुक्तीरंजन रायबाबत पोलीस म्हणाले की, मुक्तीरंजन आणि महालक्ष्मी एकाच मॉलमध्ये काम करत होते. एकाच शॉपमध्ये काम करत असल्याने दोघांची चांगली ओळख झाली.

पोलिसांनी आणखी काय माहिती दिली?

बंगळुरुचे पोलीस उपायुक्त शेखर टेक्कन्नवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीत हे स्पष्ट केलं की मुक्तीरंजन रायने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायने झाडाला दोर लटकवून गळफास घेतला. शंतनू कुमार हे पोलीस अधिकारी हे प्रकरण तपासत होते त्यांनी सांगितलं आम्हाला या मृतदेहासह एक सुसाइड नोट आढळली आहे. मुक्तीरंजन रायची ओळख आम्ही पटवली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुक्तीरंजन याने जी सुसाइड नोट लिहिली आहे त्यात महालक्ष्मीची हत्या ( Bengaluru Murder ) करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याचं मान्य केलं आहे. ओडिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान मुक्तीरंजन रायने आत्महत्या केली. पोलीस त्याचं लोकेशन शोधून त्याला अटक करणार होते. मात्र त्याआधीच त्याने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.