मुलीचं पोट भरण्यासाठी पैसे नसल्याने बंगळुरूतील एका व्यक्तीनं आपल्या दोन वर्षीय मुलीचा खून केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ४५ वर्षीय या व्यक्तीने मुलीचा खून केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोलार तालुक्यातील केन्दात्ती गावातील तलावात या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे. नदी काठावर सापडलेली आरोपीची चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी आरोपी राहुल परमारला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मूळचा गुजरातच्या असून दोन वर्षांपूर्वी पत्नी भाव्यासह बंगळुरूमध्ये स्थायिक झाला होता. मुलीची हत्या करण्यापूर्वी आरोपी पिता चारचाकीत काही वेळ मुलीशी खेळला. त्यानंतर तिला मिठी मारली आणि तिचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आफताब तिहार जेलमध्ये आत्महत्या करु शकतो? अधिकाऱ्यांना भीती, कर्मचाऱ्यांना आदेश देत म्हणाले “त्याच्याजवळ…”

आरोपीसह ही चिमुकली १५ नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. चिमुकलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर झालेल्या तपासात हा गुन्हा उघडकीस आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी बेरोजगार होता. बिटकॉईन व्यवसायात त्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ऑस्ट्रेलियात ‘बीच’वर तरुणीचा खून; मायदेशी पळून आलेल्या भारतीय आरोपीला अटक, चार वर्षांनी उलगडलं हत्येचं गूढ

घरातून सोन्याचे दागिने चोरी गेल्याची तक्रार आरोपीने बंगळुरू पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्याबाबत आरोपी सातत्याने पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करायचा. या प्रकरणाचा तपास करताना आरोपीने स्वत:च्याच घरात चोरी करून खोटी तक्रार केल्याचं उघडकीस आलं होतं. पोलिसांत बनावट गुन्हा दाखल केल्याने त्याचे परिणाम भोगावे लागतील, या भीतीपोटी परमारने आणखी काही तरी केले असावे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru man killed 2 year old daughter as he didnt have money to feed her rvs