प्रेयसीला वाढदिवसानिमित्त सरप्राइज देण्याकरता प्रियकराने भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं. परंतु, पार्टी संपताच प्रियकारने प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. बंगरुळूत हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. इंडिया टुडेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२४ वर्षीय नव्याचा मंगळवारी वाढदिवस होता. परंतु, त्यादिवशी संपूर्ण दिवस नव्याचा प्रियकर प्रशांत कामात व्यस्त होता. त्यामुळे तो तिचा वाढदिवस साजरा करू शकला नाही. परंतु, त्याने नव्याला सरप्राइज देण्याच्या उद्देशाने शुक्रवारी भव्य पार्टीचे आयोजन केले होते. पण प्रशांतला नव्याचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची कुणकुण लागली. या संशयावरून त्याने पार्टी संपताच नव्याची गळा चिरून हत्या केली.

हेही वाचा >> Asad Encounter Case : कडेकोट बंदोबस्तात असद आणि गुलामवर अंत्यसंस्कार, ड्रोनचीही होती नजर

“नव्याचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध सुरू होते. ती सातत्याने कोणालातरी मेसेज करत होती, असा प्रशांतला संशय होता”, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी राजगोपालनगर येथे एफआयआर दाखल झाला असून पोलिसांनी अटक केली आहे.

सहा वर्षांपासून होते रिलेशनशिपमध्ये

नव्या आणि प्रशांत कनकपुरा येथील राहणारे असून गेल्या सहा वर्षांपासन ते रिलेशनशीपमध्ये होते. प्रशांतवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच मृत तरुणीचा मृतदेह व्हिक्टोरिया रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.