Man Sits On Firecracker In Bet: प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. अंधकाराचा नायनाट करण्यासाठी हा प्रकाशाचा उत्सव जगभरात आता मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. पण काही अतिउत्साही लोकांमुळे सणावारांना गालबोट लागतं. बंगळुरूमध्ये मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बेरोजगार युवकाला मित्रांनी लावलेली पैज महागात पडली. फटाक्याच्या बॉक्सवर बसणाऱ्याला ऑटोरिक्षा मिळणार अशी पैज काही मित्रांनी लावल्यानंतर बेरोजगार असलेल्या ३२ वर्षीय सबरीशनं हे आव्हान स्वीकारलं. जिंकलो तर रिक्षा मिळेल आणि पोटापाण्याची काहीतरी सोय होईल, या आशेनं सबरीश फटाक्याच्या बॉक्सवर बसला. पण वात पेटताच फटाका फुटला आणि सबरीशचा दुर्दैवी अंत झाला.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबरीश आणि त्याचे मित्र ३१ ऑक्टोबर रोजी फटाके फोडून दिवाळी साजरी करत होते. त्याआधी त्यांनी मद्यप्राशन केलं होतं. मद्यप्राशन केल्यानंतर सर्व मित्र फटाके फोडण्यासाठी बाहेर पडले. यावेळी एका मित्राने सबरीशशी पैज लावली. जर फटाक्याच्या बॉक्सवर बसलास तर तुला नवीकोरी ऑटोरिक्षा घेऊन देईल, अशी पैज लावली. सबरीशनंही हे आव्हान स्वीकारलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही आता समोर आला आहे.

CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Narendra Modi on Hindu Temple Attack in Canada
PM Modi on Temple Attack: कॅनडात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून कडक शब्दात निषेध, म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार सबरीश एकटाच फटाक्याच्या बॉक्सवर बसलेला दिसत आहे. त्याच्या मित्रांनी फटाक्याची वात पेटवली आणि ते सर्व जण सुरक्षित अंतरावर जाऊन उभे राहिले. काही सेकंदात बॉक्सखाली ठेवलेला फटाका फुटतो आणि सबरीश रस्त्यावर कोसळताना दिसतो. फटाका फुटल्यानंतर त्याचे मित्र धावत त्याच्याजवळ येऊन पाहतात, तेव्हा तो जमिनीवर पडलेला आढळून येतो. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयत दाखल करण्यात येते. फटाक्याच्या तीव्रतेमुळे अंतर्गत अवयवांना धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. २ नोव्हेंबर रोजी सबरीशचा मृत्यू झाला.

हे वाचा >> दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर

पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तसेच मानवी मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Story img Loader