Gauri Khedekar Bengaluru Murder Case: बंगळुरूत नोकरीस असलेल्या महाराष्ट्रातील राकेश खेडेकर या तरुणाने काल राहत्या घरी पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून सुटकेस वॉशरूममध्ये ठेवली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला महाराष्ट्रातून अटक करून बंगळुरूला नेले आहे. दरम्यान या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

या घटनेबाबत आरोपीचे वडील राजेंद्र खेडेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मुलाची पत्नी त्यांच्या सख्या बहिणीची मुलगी असल्याचे सांगितले आहे. याचबरोबर त्यांनी, सून वेड असल्याचाही दावा केला आहे.

त्याचा मला फोन आला

दरम्यान गौरी खेडेकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी राकेश खेडेकरच्या वडिलांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला मुलाचा फोन आला होता की, ती रोज माझ्याशी भांडत होती म्हणून मी असं केलं आहे. दोन-चार दिवसांपूर्वी त्याने पत्नीच्या आईलाही फोन केला होता. त्यांना सांगितले होती, की पत्नी खूप त्रास देत आहे. त्यानंतर तिच्या आईनेही तिला समजावले होते.”

आरोपीचे वडील पीडितेचे मामा

याबाबत पुढे बोलताना आरोपी राकेश खेडेकरचे वडील राजेंद्र खेडेकर म्हणाले की, “मुलाच्या पत्नीची आई माझी सख्खी बहीण आहे आणि मुलाची पत्नी सख्खी भाची. राकेशने मला फोन केल्यानंतर, मी असं केले आहे आणि मी सुद्ध आत्महत्या करणार आहे, असे म्हणाला. याबाबत पत्नीची आई व सर्वांना सांगा, असेही त्याने सांगितेले. यानंतर मी त्याला बंगळुरूहून इकडे यायला सांगितले आणि पोलीस ठाण्यात जाऊन याची माहिती दिली.”

सून मुलाशी भांडायची

“मुलाची पत्नी वेडी होती. ती रोजच भांडण करायची. तिने त्याच्या भावालाही मारहाण केली होती. आम्ही या लग्नाला चार वर्षे विरोध केला होता. पण, ते दोघे लग्न करण्यावर ठाम होते. हे लग्न नाही झाले तर आम्ही दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही असे म्हणायचे. म्हणून आम्ही त्यांचे लग्न लावून दिले होते.”

मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या राकेश आणि गौरी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ते फेब्रुवारी २०२५ मध्ये घटना घडली त्या घरात भाड्याने राहायला आले होते. गौरी गृहिणी होती आणि ती नोकरीच्या शोधात होती.

Live Updates