Bengaluru Murder Case बंगळुरु या ठिकाणी श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहण्यास मिळालं. एका घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली. ज्यानंतर शेजाऱ्यांनी या घरात राहणाऱ्या महालक्ष्मीच्या आई आणि बहिणीला ही माहिती दिली. त्यांनी घरी येऊन पाहिलं तेव्हा त्या घरात सगळीकडे किडे झाले होते. तसंच फ्रिजमध्ये महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे ( Bengaluru Murder ) होते. या प्रकरणाला एक नवं वळण लागलं आहे. कारण संशयित आरोपीचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे. तसंच या मृतदेहाबरोबर जी सुसाइड नोट आढळली त्यात गुन्ह्याची कबुली देण्यात आली आहे.

फ्रिजमध्ये ठेवण्यात आला महालक्ष्मीचा मृतदेह

महालक्ष्मीची हत्या ( Bengaluru Murder ) झाल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तिच्याच घरातल्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. या प्रकरणात मुक्तीरंजन प्रताप राय हा प्रमुख संशयित होता. मात्र याच मुक्तीरंजनचा मृतदेह भुईनपूर गावात आढळून आला. २१ सप्टेंबर या दिवशी महालक्ष्मीच्या मृतदेहाचे ( Bengaluru Murder ) तुकडे तिच्याच घरातल्या फ्रिजमध्ये आढळले आणि तिची हत्या झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकं तयार केली होती. मुक्तीरंजन राय हाच या प्रकरणातला संशयित आहे या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले होते.

Bengaluru Mahalaxmi Murder body stored in fridge
Bengaluru Women Murder: बंगळुरूतील ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; पीडितेच्या पतीनं प्रियकर अश्रफवर व्यक्त केला संशय
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Bengaluru Mahalaxmi Murder Updates in Marathi
Bengaluru Murder : “फ्रिजमध्ये माझ्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पाहिले आणि…”, बंगळुरुत हत्या झालेल्या महालक्ष्मीच्या आईने काय सांगितलं?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

बंगळुरुचे पोलीस उपायुक्त शेखर टेक्कन्नवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीत हे स्पष्ट केलं की मुक्तीरंजन रायने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायने झाडाला दोर लटकवून गळफास घेतला. शंतनू कुमार हे पोलीस अधिकारी हे प्रकरण तपासत होते त्यांनी सांगितलं आम्हाला या मृतदेहासह एक सुसाइड नोट आढळली आहे. मुक्तीरंजन रायची ओळख आम्ही पटवली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुक्तीरंजन याने जी सुसाइड नोट लिहिली आहे त्यात महालक्ष्मीची हत्या ( Bengaluru Murder ) करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याचं मान्य केलं आहे.

ओडिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान मुक्तीरंजन रायने आत्महत्या केली. पोलीस त्याचं लोकेशन शोधून त्याला अटक करणार होते. मात्र त्याआधीच त्याने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.

हे पण वाचा- Bengaluru Murder : “फ्रिजमध्ये माझ्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पाहिले आणि…”, बंगळुरुत हत्या झालेल्या महालक्ष्मीच्या आईने काय सांगितलं?

सुसाइड नोटमध्ये काय उल्लेख आहे?

महालक्ष्मीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या ( Bengaluru Murder ) करुन आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे तिच्याच घरातल्या फ्रिजमध्ये ठेवून मुक्तीरंजन राय फरार झाला होता. बंगळुरु पोलिसांची अनेक पथकं त्याच्या मागावर होती. पोलिसांना मुक्तीरंजन रायच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट मिळाली. ज्यात मुक्तीरंजनने महालक्ष्मीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं मान्य केलं आहे. महालक्ष्मी तिच्या पतीला सोडून एकटी राहात होती. मुक्तीरंजन आणि महालक्ष्मी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आता या प्रकरणात मुक्तीरंजनचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. महालक्ष्मी आणि मुक्तीरंजन राय हे दोघंही एकाच मॉलमध्ये काम करत होते. २०२३ मध्ये त्यांची मैत्री झाली होती. महालक्ष्मी नवऱ्यापासून विभक्त झाली आहे आणि ती एकटी राहते हे रायला माहीत होतं. महालक्ष्मीची हत्या उघड झाल्यापासून मुक्तीरंजन राय त्याच्या घरात नव्हता. त्यामुळे ही हत्या त्यानेच केली असावी हा संशय पोलिसांना होता. आता त्याचा मृतदेह ओडिशातल्या गावात आढळून आला.