Bengaluru : पती आणि पत्नीमधील भांडण किंवा कौटुंबिक संघर्ष कधी-कधी इतका टोकाला जातो की एखादा व्यक्ती थेट टोकाचं पाऊल उचलतो. आता अशीच एक घटना बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीबरोबर घडली आहे. एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले अतुल सुभाष यांनी बेंगळुरूमधील एका फ्लॅटमध्ये गळफास लावून जीवन संपवलं आहे. ३४ वर्षीय अतुल सुभाष हे बेंगळुरू शहरात एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर काम करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्याआधी २४ पानी सुसाईड नोट देखील मागे सोडली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांवर छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तसंच असं म्हटलं की, पत्नीने सेटलमेंटसाठी तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. एवढंच नाही तर मुलाच्या संगोपन आणि देखभालीसाठी वेगळी रक्कम मागितली होती. या प्रकरणी अतुल सुभाष यांनी स्वत:ला न्याय देण्याची मागणी करत एक व्हिडिओ देखील बनवला. तसेच पत्नीने आपल्यावर अनेक गुन्हे दाखल करत आपला खूप छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

हेही वाचा : Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?

अतुल सुभाष यांनी एक व्हिडीओ जारी करत आपल्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, असं म्हटलं आहे. तसेच पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांमुळे आत्महत्या करत असल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडीओत आपल्याला न्याय देण्याची मागणी करत पत्नीविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, असंही म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru news engineer atul subhash committed suicide after getting tired of his wifes harassment gkt