Bengaluru woman working while driving video goes viral : रस्त्यांवर होणार्‍या अपघातामुळे दररोज देशभरात शेकडो लोकांचा मृत्यू होतो, हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न देखील केले जातात. लोकांना वाहन चालवताना फोन न वापरण्याचा सल्ला दिला जातो. असे असून देखील लोक फोन वापरताना दिसतात. यामुळे ते स्वत:चाच नाही तर दुसर्‍याचा जीव देखील धोक्यात घालतात. बंगळुरूमधील असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये एक महिला चक्क कार चालवताना तिच्या लॅपटॉपवर काम करत होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. यानंतर पोलि‍सांनी या महिलेविरोधात कारवाई करत तिला दंड ठोठावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही महिली बंगळुरूच्या गर्दी असलेल्या रस्त्यावर कार चालवत असताना लॅपटॉपमध्ये काम करत असल्याचा व्हिडीओ दुसऱ्या वाहनात बसलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने चित्रित केला होताय. गर्दी असलेल्या रस्त्यावरून जात असताना ही महिला तिच्या लॅपटॉपमध्ये मग्न असल्याचे दिसून आले होते. डीसीपी ट्रॅफिक नॉर्थ, बेंगळुरूच्या अधिकृत एक्स हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता आणि याला “घरून काम करा, गाडीत बसून गाडी चालवताना नाही.” व्हिडीओबरोबरच, पोलिसांनी तिच्याविरुद्ध चलान जारी करणाऱ्या अधिकार्‍यांचा फोटो देखील शेअर केला आहे.ॉ

ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून याला ९३,००० व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी या महिलेविरोधात कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे. अनेकांनी अनेकांचे जीव धोक्यात घातल्याबद्दल महिलेच्या वर्तणुकीवर टीका केली आहे.

“ती इन्फोसिस किंवा एल अँड टीमध्ये काम करत असावी, त्यांच्या कर्मचार्‍यांना आठवड्यातून ७० ते ९० तास काम करावे अशी त्यांची अपेक्षा असते,” अशी कमेंट एका वापरकर्त्यानेकेली आहे. तर दुसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले. “तिच्या कंपनीचे नाव उघड केले पाहिजे जेणेकरून इतर नोकरी शोधणाऱ्यांना तिथे अर्ज करणे टाळता येईल,” असे दुसर्‍या वापरकर्त्याने म्हटले आहे.