इस्रायल या देशावर शेजारच्या पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (७ ऑक्टोबर) पहाटे रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. या हल्ल्याला इस्रायलनेही रॉकेट हल्ला करून जशास तसं प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सरू आहे. आज युद्धाचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत या युद्धात दोन्ही बाजूचे सुमारे १६०० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर ७,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्य पूर्वेतील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. तर अमेरिका आणि युरोपातील काही देश इस्रायलबरोबर उभे आहेत. भारतानेही इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली आहे. अशातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केल्याची बातमी समोर आली आहे.

अमेरिकेसह, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने आज सकळी संयुक्त निवेदन जारी करत इस्रायला पाठिंबा दर्शवला आहे. हमासच्या दहशतवादी कृत्यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही संयुक्तपणे हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध करतो, असं या राष्ट्रांनी निवेदनात म्हटलं आहे.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”

अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्रिटनने संयुक्त निवेदनात म्हटलं की, आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कॉल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आम्ही सर्वजण एकजुटीने इस्रायलला पाठिंबा देतो. आम्ही हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध करतो.” या युद्धजन्य परिस्थितीत भारतही इस्रायलच्या बाजूने उभा असून भारतानेही हमासचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मला फोन करून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली, याबाबत मी त्यांचे आभार मानतो. या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो.

हे ही वाचा >> इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत १,६०० निष्पाप बळी, दहशतवाद्यांकडून ओलिसांना ठार मारण्याची धमकी, नेतन्याहू म्हणाले…

इस्रायलच्या सीमेवर आणि गाझा पट्टीत विध्वंस सुरू आहे. हमासने १५० हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. इस्रायलच्या प्रतिहल्ल्यानंतर हमासची पिछेहाट झाली आहे. गाझा पट्टीचा काही भाग इस्रायली सैन्याने आपल्या ताब्यात घेतला आहे. अशातच हमासने १५० ओलिसांना ठार करण्याची धमकी दिली आहे. “आमच्यावर हल्ला केलात, गाझा पट्टीत रॉकेट हल्ले केले तर कोणत्याही क्षणी आम्ही ओलिसांना ठार करू”, अशी धमकी हमासचा प्रवक्ता अबू उबैदा याने इस्रायलला दिली आहे. तर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी “हे युद्ध आम्ही सुरू केलं नसलं तरी या युद्धाचा शेवट आम्हीच करू”, असा इशारा हमासला दिला आहे.