अमेरिकेत न्यूयॉर्कमधील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने तीन मिनिटांमध्ये ९०० जणांना नोकरीवरुन काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. बेटर डॉट कॉम नावाच्या कंपनीमधून ही कर्मचारी कपात करण्यात आलीय. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी मागील बुधवारी कर्मचाऱ्यांसोबत झूम कॉल केला होता. याच बैठकीत गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. हा आकडा कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या १५ टक्के आहे. गर्ग हे भारतीय वंशाचे असल्याचे या बातमीची भारतामध्येही चांगलीच चर्चा रंगलीय. जगभरामध्ये विशाल यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.
नक्की वाचा >> जॉब स्वीच करणं महागात पडणार! …तर नोकरी सोडताना संपूर्ण पगारावर भरावा लागणार १८ टक्के जीएसटी
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेसहीत जगभरामधील अनेक देशांमध्ये सुट्ट्यांचा कालावधी सुरु होतोय. त्यापूर्वीच कंपनीने कॉस्ट कटींगचा विचार करुन मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केलीय. कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे याची कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना देण्यात आली नव्हती. बेटर डॉट कॉमची गुंतवणूक जपानमधील सॉफ्ट बँकेमध्ये आहे. या कंपनीचं एकूण मूल्य हे ७ अब्ज डॉलर इतकं आहे.
नक्की पाहा हे फोटो >> तीन मिनिटांच्या Zoom Call मध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या भारतीय वंशाच्या सीईओची संपत्ती किती माहितीय का?
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने केवळ तीन मिनिटांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात पिंक स्लिप दिली. ‘मार्केट बदललं आहे. आपल्याला संघर्ष करत राहयला हवं. त्यामुळेच हा निर्णय स्वीकारुन तुम्ही पुढे वाटचाल करावी,’ असं गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं.
नक्की वाचा >> पगारावर १८ टक्के GST: “सरकारच्या तिजोरीत भर पडली पाहिजे हे खरे, पण त्यासाठी…”; शिवसेनेनं केंद्रावर साधला निशाणा
कर्मचाऱ्यांचे कंपनीमध्ये फारसं योगदान नाहीय असं गर्ग यांनी आधी सांगितलं. त्यानंतर वर्किंग अवर्स म्हणजेच कामाच्या तासांसंदर्भात आपला आक्षेप व्यक्त करताना तुम्ही केवळ दोन तास काम करता, असंही गर्ग म्हणाले. गर्ग यांनी पुढे बोलताना हा कॉल झाल्यानंतर तुम्हाला एचआरकडून कामावरुन काढून टाकल्याचा ईमेल येईल, अशी माहिती दिली.
नक्की पाहा >> Video: Wipro मधील IT श्रेत्रातील नोकरी सोडली अन्…; कोल्हापुरी चपलांच्या परंपरेसाठी धडपडणारा मुंबईकर
२०२० मध्येही गर्ग यांनी कर्मचाऱ्यांवर ते आळशी असल्याचा आरोप केल्याचं वृत्त फोर्ब्सने दिलं होतं.