आंतरराष्ट्रीय योग दिनावरील परिषदेदरम्यान चिनी भाषेतील भगवद्गीता प्रकाशित करण्यात आल्यानंतर कम्युनिस्ट देशांत तिचा प्रवेश झाला आहे.
शांघायमधील झेजियांग विद्यापीठातील प्रा. झू चेंग आणि लिंग हाई यांनी भगवद्गीतेचे चिनी भाषेत भाषांतर केले असून, सिचुआन पीपल्स पब्लिकेशनच्यावतीने ती प्रकाशित करण्यात आली आहे. भारतातील प्रसिद्ध योग प्रशिक्षकांच्या उपस्थितीत भगवद्गीतेचे प्रकाशन करण्यात आले.
चीनमधील भारताचे राजदूत अशोक के. कांत यांनी या भगवद्गीतेचे प्रकाशन केले.
चिनी भाषेतील भगवद्गीता प्रकाशित
आंतरराष्ट्रीय योग दिनावरील परिषदेदरम्यान चिनी भाषेतील भगवद्गीता प्रकाशित करण्यात आल्यानंतर कम्युनिस्ट देशांत तिचा प्रवेश झाला आहे.
First published on: 19-06-2015 at 06:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagavad gita in chinese language