प्रसिद्ध निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज Gopal Krishna Maharaj यांचा श्रीमद्भागवत कथा सांगताना आणि भजन करतानाच मृत्यू झाला. गोपाळकृष्ण महाराज किर्तन करत होते आणि भजन म्हणत होते. त्यांच्याबरोबर लोकही डोलू लागले, नाचू लागले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे ते खाली कोसळले. अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उज्जैनमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
उज्जैनचे प्रसिद्ध कथाकार भागवताचार्य गोपाळकृष्ण महाराज Gopal Krishna Maharaj हे कथा सांगत असताना आणि निरुपण करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गुरुपौर्णिमा म्हणजेच रविवार दिनांक २१ जुलै या दिवशीच ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंडित गोपाळकृष्ण महाराज Gopal Krishna Maharaj राजगढ या ठिकाणी त्यांच्या गुरुंच्या समाधीस्थळीच कथा ऐकवत होते, भजन गात होते त्यावेळीच ही घटना घडली.
हे पण वाचा- किर्तनकार अजय बारसकरांवर जरांगेंचं टीकास्त्र | Manoj Jarange Patil
भक्तगण तल्लीन झाले होते, त्याचवेळी गोपाळकृष्ण महाराज कोसळले
पाढलिया आंजना समाज, श्री सद्गुरु सेवा समितीने गोपाळकृष्ण महाराजांची कथा आयोजित करण्यात आली होती. कथा आणि भजनात भक्तगणही तल्लीन झाले होते. त्याचवेळी गोपाळकृष्ण महाराजांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा अंत झाला.
गोपाळकृष्ण महाराजांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण वाटेतच त्यांचा मृत्यू
निरुपणकार Gopal Krishna Maharaj खाली कोसळलेले पाहून लोक गोंधळून गेले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. तसंच अनेक भक्त रडू लागले, सगळंच वातावरण शोकाकुल झालं होतं. यानंतर पंडीत गोपाळकृष्ण महाराज यांचं पार्थिव उज्जैनला आणण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाची अंतयात्रा काढण्यात आली. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी झाली होती. भागवताचार्य गोपाळकृष्ण महाराज यांच्या निधनाचा व्हिडीओही समोर आला आहे. जो व्हायरल झाला आहे.
गोपाळकृष्ण महाराजांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे
गोपाळकृष्ण महाराज गात असतानाच त्यांचा आवाज अचानक बंद झाला. त्यांच्याकडे लोकांनी पाहिलं तर त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले असं लोकांनी पाहिलं. ज्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रिकाने हे वृत्त दिलं आहे.