पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा लग्न करत आहेत. गुरुवारी (७ जुलै) चंडीगडमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. भगवंत मान यांचं हे दुसरं लग्न आहे. यावेळी त्यांचं लग्न डॉ गुरुप्रीत कौर यांच्याशी होणार आहे. कुटुंबातील जवळच्या मोजक्या लोकांच्या उपस्थित हे लग्न होणार आहे. त्यांच्या आधीच्या पत्नीसोबत त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना पहिल्या लग्नातून दोन मुलं आहेत. ते अमेरिकेत राहतात.
भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीचं नाव इंद्रजीत होतं. २०१६ मध्ये भगवंत मान आणि इंद्रजीत यांनी घटस्फोट घेतला. तेव्हा भगवंत मान यांना असं का केलं हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मान यांनी उत्तर देताना म्हटलं, “मला पंजाब किंवा कुटुंब यापैकी एकाची निवड करायची होती. मी पंजाबची निवड केली.”
विशेष म्हणजे भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा अमेरिकेतील त्यांची दोन मुलं आणि पत्नी देखील हजर होते.
हेही वाचा : “आम्हाला सैन्य भाड्याने नको”; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा ‘अग्निपथ’ योजनेवर हल्लाबोल
लग्नाचा संपूर्ण खर्च भगवंत मान उचलणार
या लग्नाचा संपूर्ण खर्च स्वतः भगवंत मान उचलणार आहेत. डॉक्टर गुरुप्रीत कौर देखील शिख आहेत. त्या मान कुटुंबीयांच्या निकटवर्ती असल्याचं बोललं जातं. मागील मोठ्या कालावधीपासून भगवंत मान व गुरुप्रीत कौर एकमेकांना ओळखतात. मान यांच्या आईलाही ही मुलगी पसंत होती.