जयपूर : भजनलाल शर्मा यांचा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा येथे शुक्रवारी उत्साहात पार पडला. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येथील ऐतिहासिक ‘अल्बर्ट हॉल’समोर झालेल्या या सोहळयात राज्यपाल मिश्रा यांनी दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनाही शपथ दिली. कुमारी आणि बैरवा यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> कर्नाटकात पुन्हा टीपू सुलतानचा वाद, मैसूर विमानतळाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावावरुन काँग्रेस भाजपा आमने-सामने

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
melghat assembly constituency
मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

५७ वर्षीय शर्मा यांचा शुक्रवारी वाढदिवस असतानाच या सोहळयाचा योग जुळून आला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हिंदीतून शपथ घेतली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आयोजित या सोहळयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजेही या सोहळयास उपस्थित होते. शपथविधी सोहळयानिमित्त जयपूरचे मुख्य रस्ते आणि प्रवेशद्वार सजवले होते. यामध्ये भाजपचे झेंडे आणि केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे भित्तिफलक आणि फलक लावण्यात आले होते. शपथविधीदरम्यान समर्थकांनी श्रीराम आणि मोदींचा जयजयकार केला. या कार्यक्रमाला राज्यभरातून भाजपचे आमदार, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.

शपथविधी सोहळयाच्या काही काळ आधी राम निवास बागेतील प्रवेशद्वारावर काही लोकांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी त्यांना थांबवण्याआधीच काही लोकांनी उभारलेले अडथळे ओलांडले. मात्र काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

अल्प परिचय

भजनलाल हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. ते राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर आहेत. शर्मा यांनी जयपूरच्या सांगानेर जागेवर ४८ हजार ०८१ मतांनी विजय मिळवला. तो भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे विधिमंडळ पक्षनेतेपदी शर्मा यांचे नाव स्वत: मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीच सुचवले होते. सर्व दिग्गजांऐवजी पक्षाने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी प्रथमच आमदारपदी निवडून आलेल्या शर्माकडे सोपवली आहे.