SC\ST कायद्यातील बदलांविरोधात दलित संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला हिंसक वळण लागले आहे. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि झारखंडमध्ये या बंदविरोधात हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी गाडया फोडण्यात आल्या आहेत तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

SC\ST कायद्यातील बदलांविरोधात दलित संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला हिंसक वळण लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच या कायद्यात बदल करण्या संदर्भात निकाल दिला आहे. आता अनेक दलित संघटना या निर्णयाला विरोध करत आहे. काही राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. SC\ST कायद्यातील बदल मागे घेऊन हा कायदा पूर्वीसारखा लागू करावा अशी दलित संघटनांची मागणी आहे. दरम्यान केंद्र सरकार SC\ST अॅक्टसंबंधी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करु शकते.

एससी आणि एसटीच्या कल्याणासाठी राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. कायदा आणि सुव्यवस्थान न बिघडवण्याचे मी सगळयांना आव्हान करतो. कुठे काही मुद्दा असल्यास तो तुम्ही सरकारच्या निदर्शनास आणून द्या.

पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून तिथे शाळा, औद्योगिक कार्यालये बंद आहे. पंजाबमधील सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे आज होणारे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.

– राजस्थानच्या बारमेरमध्ये आंदोलकांनी गाडया पेटवून दिल्या, मालमत्तेचे नुकसान केले.

– उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाडयांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.

– पंजाबच्या पितयाळामध्ये आंदोलकांनी ट्रेन रोखल्या.

– बिहारच्या फोरबीसगंज येथे आंदोलकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केले.