नवी दिल्ली : सरकारने संसदेमध्ये लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करू न दिल्यामुळे काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रा काढत असल्याचे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी स्पष्ट केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेचा लोगो खरगेंनी जारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या यात्रेदरम्यान जनतेशी आर्थिक विषमता, जातीनिहाय जनगणना, बेरोजगारी या मुद्दयांवर संवाद साधला जाईल असे खरगे यांनी सांगितले. तसेच, राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्त्वांची पुनस्र्थापना करण्यास पुढाकार घेणे हे यात्रेचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रकिनाऱ्यावर आणि मंदिर बांधकामाच्या ठिकाणी छायाचित्रे काढून घेण्यास वेळ आहे, मात्र हिंसाग्रस्त मणिपूरला जायला वेळ नाही अशी टीका खरगे यांनी केली.

हेही वाचा >>> “विष्णूचे १३ वे अवतार आहात, तर…”, ईव्हीएमवरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “तुमच्या प्रिय इस्रायलमध्ये…”

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि के सी वेणुगोपाल यावेळी खरगे यांच्याबरोबर उपस्थित होते.

जागावाटपावर लवकरच चर्चा

इंडिया आघाडीतील जागावाटप आणि पदांवरील नियुक्त्या यासंबंधीचा निर्णय १० ते १५ दिवसांमध्ये घेतला जाईल असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. यावरून, लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी लवकरच समन्वयकाची घोषणा करेल अशी शक्यता आहे.

२८ पक्षांना जे मुद्दे उपस्थित करायचे होते ते त्यांना उपस्थित करू दिले नाही. त्या मुद्दयांवर आम्ही लोकांशी संवाद साधणार आहोत, तसेच लोकांच्या समस्याही ऐकणार आहोत. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस</p>