नवी दिल्ली : कन्याकुमारी ते काश्मीर मार्च काँग्रेस पक्षासाठी ‘मोठा बुस्टर डोज’ आहे आणि ते एक ऐतिहासिक जनआंदोलन होते; जे समाज एकजूट करण्याचा पर्याय ठरले, अशा शब्दांत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चक्रीवादळामुळे व्हिएतनाममध्ये विमानतळे बंद करण्याचे आदेश

भारतीय नागरिक स्वाभाविकरीत्या प्रेम करणारे आहेत हे या यात्रेने सिद्ध केले. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रेमाचा आवाज ऐकला जावा, हेच या अभियानाचे लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील समाज माध्यमावर यात्रेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाकडून ही यात्रा मैलाचा दगड ठरल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> ६२ हजार खटले ३० वर्षांपासून प्रलंबित; सर्व प्रकरणे उच्च न्यायालयांमधी

संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी जनतेने संघर्ष सुरूच ठेवावा. आर्थिक असमानता, महागाई, बेरोजगारी, सामाजिक अन्याय, संविधानाचा नाश, सत्तेचे विकेंद्रीकरणसारख्या मुद्द्यांवर आमचा संघर्ष सुरूच राहील. द्वेष आणि फूट पाडण्याचे कारस्थान हाणून पाडू. प्रेम आणि मानवतेचा विजय निश्चित आहे. काँग्रेस पक्ष थांबणार नाही. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

भारत जोडो यात्रेत मौनामधील सौंदर्य दिसले. व्यक्तीचे ऐकण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याच्या शक्तीचा शोध घेतला. प्रत्येक आवाजात ज्ञान आहे, नवे शिकायलाही मिळाले आणि प्रत्येकाने आपल्या भारत मातेचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रेम द्वेषावर विजय मिळवेल आणि आशा दहशतीला पराभूत करेल, हेच आमचे अभियान आहे. राहुल गांधी, काँगेस नेता

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jodo yatra create unity in society rahul gandhi claim on 2nd anniversary zws