कन्याकुमारीपासून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये पोहोचली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते काश्मीरच्या दिशेने पायी चालत आहेत. एकीकडे कडाक्याची थंडी असताना दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढताना दिसतोय. राहुल गांधी यांना थंडी कशी वाजत नाही? ते फक्त टीशर्टवर कसे काय चालत आहेत? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असताना हाडं गोठवणाऱ्या थंडीत काँग्रेसचे काही कार्यकर्ते चक्क शर्टविना दिसले आहेत. हे कार्यकर्ते धुकं आणि थंडीमध्ये चक्क नाचत होते.काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या कृतीकडे राहुल गांधी यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा >>> “फडणवीसांनी मध्यस्थी करावी” म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आम्हाला…”

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

सध्या दिल्ली, हरियाणा, पंजाब, काश्मीर तसेच उर्वरीत भारतात कडक्याची थंडी पडली आहे. असे असतानाही राहुल गांधी फक्त टीशर्टवर कसे राहू शकतात? त्यांना थंडी वाजत नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावरून भाजपाच्या नेत्यांकडूनही टीका-टिप्पणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हरियाणामधील कर्नाल येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली कृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. भारत जोडो यात्रा तसेच राहुल गांधी यांचे स्वागत करताना काँग्रेसचे काही कार्यकर्ते चक्क शर्टविना दिसले आहेत. एकीकडे कडाक्याची थंडी तसेच धुकं असताना हे कार्यकर्ते दंडबैठका काढत आहेत. बसवर उभे राहून ते आम्हाला थंडीची पर्वा नाही, असे सूचित करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या कृतीला राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा >>> थंडी वाजत नाही का? म्हणणाऱ्यांना राहुल गांधींचे सणसणीत उत्तर; म्हणाले “माझ्या टीशर्टपेक्षा…”

राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी असा कोणता जीवाणू आहे, ज्यामुळे थंडी वाजत नाही, यावर संशोधन सुरू आहे, असे विधान केले होते. “राहुल गांधी आपल्या डॉक्टरांकडून थंडीबाबत संशोधन तर करत नाही ना? राहुल गांधींना थंडी न वाजण्यामागे कोणता जीवाणू आहे, याची आम्ही माहिती घेत आहोत. तसेच, राहुल गांधी हे खरे गांधी वाटत नाहीत. राजीव गांधी यांच्याबद्दल त्यांना काही माहिती आहे का?,” असा प्रश्न ब्रजेश पाठक यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>> Air India peeing case : लघुशंका केलेल्या सीटवरच महिलेला बसवलं? सहप्रवाशाने सांगितलं ‘त्या’ दिवशी विमानात नेमकं काय घडलं! 

दरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्या टीशर्टवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिले होते. मला एक कळत नाही, माझ्या टी शर्टवर एवढा आक्षेप का घेतला जातो? एवढी चर्चा का केली जाते आहे. या टी-शर्टमध्ये एवढं आक्षेप घेण्यासारखं काय आहे? इथे कुणीही टी शर्ट घातलेला नाही का? तुम्हाला काय वाटतं मी स्वेटर घालू? त्यापेक्षा मी एक काम करतो भारत जोडो यात्रा संपल्यानंतर मी एक व्हिडिओ तयार करतो. त्यात मी हे सांगेन की टी-शर्ट घालून कसं चालतात. थंडी कशी कमी करतात? असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.

Story img Loader