खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत दोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार असून त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. दरम्यान, या राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने आपली यात्रा सध्या स्थगित केली आहे. याआधीही राहुल गांधी यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप राहुल काँग्रेसने केला आहे.
हेही वाचा >>> आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले, “महाविकास आघाडीने ४ किंवा ६ जागा…”
राहुल गांधी काश्मीर खोऱ्यात एकूण ११ किलोमीटर चालणार होते
भारत जोडो यात्रा आज स्थगित करण्यात आली. सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसही ही यात्रा स्थगित केली आहे. राहुल गांधी आज काश्मीर खोऱ्यात एकूण ११ किलोमीटर चालणार होते. मात्र काही अंतर चालल्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावरून ही यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सरकारने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था केलेली नाही. अचानकपणे सुरक्षा रक्षक कमी करण्यात आले, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
हेही वाचा >>> आनंद दिघेंच्या जयंतीदिनी राजन विचारेंनी जारी केला खास व्हिडीओ; म्हणाले, “…हीच दिघे साहेबांना गुरुदक्षिणा”
राहुल गांधी ३० मिनिटे आपल्या जागेवरून पुढे जाऊ शकले नाही
यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी श्रीनगरकडे जाताना बनिहाल बोगदा ओलांडला होता. मात्र थोड्या वेळानंतर अचानकपणे मोठी गर्दी झाली. तसेच यावेळी योग्य सुरक्षा व्यवस्था नव्हती. याच कारणामुळे राहुल गांधी यांना ही यात्रा थांबवावी लागली. या गर्दीमुळे राहुल गांधी ३० मिनिटे आपल्या जागेवरून पुढे जाऊ शकले नाहीत. गर्दी वाढल्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या वाहनामधून त्यांना तेथून बाजूला नेण्यात आले, अशी माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली.
कोणत्याही सुरक्षेविना राहुल गांधी चालत होते
काँग्रेसचे नेते केसी वेनुगोपाल यांनीदेखील मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “राहुल गांधी आणि ओमर अब्दुला यांच्या सुरक्षेसाठी तेथे पोलीस नव्हते. कोणत्याही सुरक्षेविना राहुल गांधी चालत होते. मी त्यांच्या सुरक्षेबाबात खूप चिंतेत आहे,” असे केसी वेनुगोपाल म्हणाले.
हेही वाचा >>> पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यावेळी मी…”!
दरम्यान, याआधीही राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केलेल आहे.