कविमनाचे, अजातशत्रू, मुत्सद्दी, वक्ता दशसहस्र्ोषु.. अशी एकापेक्षा एक सरस विशेषणे ज्यांच्या नावापुढे लावली जातात अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ पंडित मदनमोहन मालवीय यांनाही मरणोत्तर ‘भारतरत्न’ सन्मान जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनातून बुधवारी या संदर्भातील घोषणा करण्यात आली. प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला समारंभपूर्वक हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात येईल. विशेष म्हणजे वाजपेयी यांचा आज, गुरुवारी ९०वा वाढदिवस आहे तर मालवीय यांची १५३वी जयंती आहे.
आओ फिरसे दिया जलाए..
‘भारतरत्न’ची साठ वर्षांची कहाणी
मालवीय यांना भारतरत्न देणे असमर्थनीय- रामचंद्र गुहा
५० हून अधिक वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने वाजपेयी आणि मालवीय यांना ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे केली. प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ
ऊसी. एन. आर. राव व विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना गेल्या वर्षी या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. आतापर्यंत ४५ जणांना हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पंडित मदनमोहन मालवीय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांना ‘भारतरत्ना’ने सन्मानित केले जाणे, हा त्यांचा उचित सन्मान आहे. त्यांनी केलेल्या देशसेवेची ही पावतीच आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
वाजपेयी आणि मालवीय यांच्या उचित सन्मानाबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन! केंद्र सरकार ‘राजधर्म’ आणि धर्मनिरपेक्षतेचे पालन करील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
– अजय माकन, प्रवक्ते, काँग्रेस</strong>
फोटो गॅलरी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’