भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर, आज (रविवार) सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. यावेळी संघाच्या नेत्यांसोबत भाजयूमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर उपस्थित राहिले.
लोकसभा निवडणुकीतील प्रचारयंत्रणा आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी सिंग सरसंघचालकांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीनंतरच्या रणनिती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मोदी यांनी संघाचे वरिष्ठ नेते सुरेश सोनी, दत्तात्रय हौसबोली आणि भैय्याजी जोशी यांच्यासह सरसंघचालकांची भेट घेतले. तब्बल दोन तास चाललेल्या या भेटीत यूतीचे सरकार आल्यावर पक्ष संघटनेत कुणाला स्थान द्यायचे आणि कुणाला मंत्रीपद बहाल करायचे यासंबंधी चर्चा झाली असल्याचे नाकारून चालणार नाही. काही दिवसांपूर्वीच उमा भारती आणि मुरलीमनोहर जोशी यांनीदेखील सरसंघचालकांची भेट घेतली आहे.
सरसंघचालकांच्या भेटीला राजनाथ सिंह
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर, आज (रविवार) सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरसंघचालकांची भेट घेतली.
First published on: 11-05-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharatiya janata party congress elections 2014 mohan bhagwat narendra modiloksattaloksatta newsmarathimarathi news