नवी दिल्ली : ज्येष्ठ भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचे शनिवारी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात गेल्या सात महिन्यांपासून उपचार सुरू होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वयाच्या पाचव्या वर्षी प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना रुक्मिणीदेवी अरुंदले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. कुचिपुडीच्या नृत्य प्रकारातही त्या पारंगत होत्या. कृष्णमूर्ती यांना १९६८ मध्ये पद्माश्री, २००१ मध्ये पद्माभूषण आणि २०१६ मध्ये पद्माविभूषण पुरस्कार मिळाले. १९७७ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.