‘भारती एअरटेल लिमिटेड’ या भारतातील दुरध्वनी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने भारतभर कॉलरेटमध्ये दरवाढीचा निर्णय घेतला आहे. कंपनीला झालेला तोटा भरुन काढण्यासाठी कॉलदरात वाढ करण्यात आली आहे. “वाढते शुल्कदर आणि गेल्या वर्षभरात कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे त्यामुळे सदर कॉलरेट मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला” असे भारती एअरटेल कंपनीने आपल्या विधानात स्पष्ट केले आहे. अद्याप कंपनीमार्फत कॉलदरात झालेल्याचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. तरी सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार एअरटेल प्रीपेड रिचार्ज कूपनच्या दरात पाच ते पंधरा रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे     

Story img Loader