एअरटेलकडून ध्वनिलहरींची खरेदी
मोबाइल ग्राहकसंख्येत देशात सर्वात मोठय़ा असलेल्या भारती एअरटेलने व्हिडीओकॉनच्या दूरसंचार ध्वनिलहरी खरेदी करण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी ४,४२८ कोटी रुपये मोजले आहेत. १८०० मेगाहर्टझ बॅण्डच्या उत्तर भारतातील सहा परिमंडळातील या ध्वनिलहरी स्पर्धक कंपनीला विकून व्हिडीओकॉन भारतातील दूरसंचार व्यवसायातून बाहेर पडली आहे.
विद्युत उपकरण निर्मितीतील क्षेत्रातील व्हिडीओकॉन समूहाने नोव्हेंबर २०१२ मध्ये झालेल्या ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेत भाग घेत बिहार, हरयाणा, मध्य प्रदेश, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश व गुजरात परिमंडळात शिरकाव केला होता. भारती एअरटेलला मिळालेले हे ध्वनिलहरी परवाने डिसेंबर २०३२ पर्यंत वैध राहणार आहेत. यापोटी भारतीने मोजलेली रक्कम ही २०१२ मधील रकमेच्या २.४ पट आहे. व्हिडीओकॉनसाठी यापूर्वी बिर्ला समूहातील आयडिया सेल्यूलरने प्रयत्न केला होता.
भारतीय दूरसंचार क्षेत्रात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने नुकताच रशियन भागीदार सिस्टेमा श्याम टेलिसव्र्हिसेसचा ताबा घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा