Bhopal Gas Tragedy: भोपाळ गॅस दुर्घटनेचा उल्लेख करत अमेरिकेतल्या १२ खासदारांनी डाऊ केमिकल्सच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाला या १२ खासदारांनी पत्र लिहिलं आहे. डाऊ केमिकल्स या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेलाच आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई केली गेली पाहिजे असं आता या बारा सदस्यांनी म्हटलं आहे.

डाऊ केमिकल्सची शेजारी असलेल्या युनियन कार्बाईड कंपनीत १०० टक्के भागिदारी होती. डिसेंबर १९८४ मध्ये युनियन कार्बाईड या कंपनीतून विषारी गॅसची गळती झाली होती. त्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला. तसंच हजारो लोकांना अपंगत्व आलं होतं. आजही ही घटना ही भारताच्या इतिहासातल्या भयंकर घटनांपैकी एक मानली जाते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

काय घडलं होतं भोपाळ दुर्घटनेत?

२ आणि ३ डिसेंबर १९८४ या दोन दिवशी युनियन कार्बाईड या कंपनीतून विषारी गॅसची गळती झाली होती.

या दुर्घटनेत ५ हजार २९५ लोकांचा मृत्यू झाला, ही त्यावेळी अधिकृत दिलेली संख्या होती. मात्र १९९७ मध्ये सरकारने सांगितलं की या घटनेत २५ हजार लोकांचा मृत्यू झाला

गॅस गळतीचा थेट परिणाम ५ लाख ५८ हजार १२५ लोकांवर झाला होता

७ डिसेंबर १९८४ या दिवशी कंपनीचा सीईओ अँडरसनला अटक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा तासांत वॉरेन अँडरसनला सोडून देण्यात आलं.

युनियन कार्बाईडने ४७० मिलियन डॉलर्सची भरपाई या बदल्यात दिली होती.

१९९२ मध्ये भोपाळ कोर्टाने अँडरसनला फरार घोषित केलं. त्यानंतर २०१४ मध्ये या प्रकरणातला मुख्य आरोपी अँडरसनचा मृत्यू झाला.

भोपाळच्या कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी डाऊ केमिकल्सने न्यायालयात हजर राहिलं पाहिजे यासाठी सातवेळा डाऊ केमिकल्सला समन्स पाठवण्यात आलं आहे. सातव्या समन्समध्ये ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेच्या द वीक या वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या वृत्तानुसार डाऊ केमिकल्सला समन्स पाठवूनही अमेरिकेच्या सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई केलेली नाही. आता या प्रकरणी १२ सदस्यांनी आवाज उठवला आहे तसंच या प्रकरणी कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.

Story img Loader