काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंग यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उद्यापासून दोन दिवस भोपाळच्या दौऱ्यावर जात आहेत. भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटतील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांच्याबाबतची वस्तुस्थिती भोपाळकरांच्या निदर्शनास आणून देण्याकरिताच भुजबळ हे भोपाळमध्ये प्रचार करणार असल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. प्रज्ञासिंग यांनी करकरे आणि राज्य पोलिसांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ भोपाळमध्ये प्रचार करणार आहेत.