दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी देविंद्रपालसिंग भुल्लर याच्या फाशीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी त्याच्या पत्नीने केली आहे. सर्वोच्च न्यायालयात तिने मंगळवारी यासंदर्भात याचिका दाखल केली. सप्टेंबर, १९९३ मध्ये दिल्लीत बॉम्बस्फोट घडवल्याच्या आराोपावरून भुल्लर याला फाशी सुनावण्यात आली आहे. खलिस्तान स्वातंत्र्य चळवळीचा दहशतवादी असल्याचा त्याच्यावर ठपका आहे.
देविंद्रच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्याच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. पतीच्या शिक्षेच्या पुनर्विचार व्हावा अशा आशयाची याचिका तिने १२ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी होईपर्यंत पतीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशी मागणी तिने मंगळवारी न्यायालयात केली. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची भुल्लरची याचिका यापूर्वीच न्यायालयाने फेटाळली आहे. तर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. त्याच्या फाशीच्या शिक्षेवर १२ एप्रिल रोजी शिक्कामोर्तब झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा