महेश सरलष्कर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भूपेंदर यादव मूळचे राजस्थानमधील अजमेरचे. पण, लहानाचे मोठे झाले ते दक्षिण हरियाणातील पटौदी भागामध्ये. हा भागही यादवप्रभुत्व असलेला. पण, त्यांच्यासाठी यादव मतांमुळे अलवर अधिक सुरक्षित असेल.
नवी दिल्ली : भाजपमध्ये ‘लंबी रेस का घोडा’ असे ज्या नेत्यांबद्दल बोलले जाते, त्यामध्ये अग्रभागी आहेत भूपेंदर यादव. २०२१ मध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील फेरबदलामध्ये यादव केंद्रीय पर्यावरणमंत्री झाले. त्यामुळे सरकार कसे चालवले जाते, याचाही अनुभव यादव यांनी घेतलेला आहे. २०१२ पासून ते राज्यसभेचे खासदार होते, आता मोदींनी त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. राजस्थानमधील अहिरवार पट्टयातील अवलरमधून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा >>> ओडिशात भाजप स्वबळावर, लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; बीजेडीशी युतीच्या चर्चेला पूर्णविराम
दक्षिण हरियाणा आणि त्याला लागून असलेल्या राजस्थानातील अलवर पट्टयामध्ये यादव समाजाची मते निर्णायक ठरतात. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अलवर जिल्ह्यातील तिजारा मतदारसंघातून भाजपचे बाबा बालकनाथ विजयी झाले होते. हा मुस्लिमबहुल मतदारसंघ असूनही यादव आणि दलित यांच्या मतांमुळे बालकनाथ आमदार होऊ शकले. अलवरमध्ये हेच गणित भूपेंदर यादव यांच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. भूपेंदर यादव मूळचे राजस्थानमधील अजमेरचे. पण, लहानाचे मोठे झाले ते दक्षिण हरियाणातील पटौदी भागामध्ये. हा भागही यादवप्रभुत्व असलेला. त्यामुळे हरियाणातील भिवानी-महेंद्रगढमधून यादव लढतील असे मानले जात होते. पण, त्यांच्यासाठी यादव मतांमुळे अलवर अधिक सुरक्षित असेल.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी २०१० मध्ये भूपेंदर यादव यांना भाजपमध्ये आणले. गेल्या १४ वर्षांत यादव यांनी पक्षामध्ये संघटनात्मक कौशल्य असलेला सशक्त नेता अशी ओळख निर्माण केली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ‘सर्वेसर्वा’ अमित शहा यांच्या तालमीत भूपेंदर यादव राजकीय परिपक्व झाले आहेत. यादव हे अमित शहांप्रमाणे संघटनेतील ‘संकटमोचक’ आहेत. त्यांनी राष्ट्रीय महासचिव म्हणून बिहार, गुजरात, राजस्थान, झारखंड अशा वेगवेगळया राज्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे. रात्रं-दिवस बैठक मारून राजकीय बुद्धिबळावरील सोंगटया हलवत राहण्याच्या संयमी खेळातही ते माहीर आहेत. यादव पेशाने वकील आहेत, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेली आहे. त्यामुळे वकिली डावपेच वापरून विरोधकांवर कशी मात करायची हेही यादव जाणतात.