Israel – Hamas News in Marathi : इस्रायलच्या लष्कर जमीन, हवाई आणि समुद्रामार्गे गाझामध्ये कारवाई सुरू करण्यासाठी सज्ज असून केवळ आदेशाची वाट पाहात असल्याचे जाहीर केले आहे. तसेच गाझाच्या साधारणत: उत्तरेकडील भागात राहणाऱ्या नागरिकांना तेथून बाहेर पडण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. त्यामुळे या भागात प्रचंड गोंधळाची स्थिती असून जीव वाचविण्यासाठी नेमके जायचे कुठे, असा प्रश्न गाझामधील २३ लाख नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गाझा ताब्यात घेण्याविरोधात इशारा दिला आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये २९ अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे.

हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यानंतर गेला आठवडाभर इस्रायलची विमाने गाझा पट्टीवर अक्षरश: आग ओकत आहेत. गाझामध्ये सर्वत्र गोंधळाची स्थिती असतानाच रविवारी इस्रायलने गाझाचा उत्तरेकडील भाग रिकामा करण्याचे आदेश जारी केले. गाझाच्या उत्तर भागात हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यापूर्वी रहिवाशांना तेथून हलवण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

हेही वाचा >> उत्तर गाझामधून हजारोंचे स्थलांतर; २३ लाख रहिवाशांवर इस्रायली सैन्याच्या चढाईचे सावट

दरम्यान, इस्रायल-हमास युद्धात अमेरिकेने इस्रायलची बाजू घेतली आहे. परंतु, गाझावर पूर्णपणे कब्जा न करण्याचा इशारा इस्रायलला दिला आहे. जो बायडन यांनी सीबीएस न्युजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, गाझा पट्टी ताब्यात घेणं ही इस्रायलसाठी मोठी चूक ठरू शकेल. हमास संघटना ही पॅलेस्टिनी नागरिकांचं प्रतिनिधित्व करत नाही. त्यामुळे गाझा पुन्हा ताब्यात घेणं इस्रायलची चूक ठरू शकेल. तसंच, गाझामधून अतिरेक्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यामुळे युद्ध नियमांची काटेकोर अंमलबजावणी इस्रायलकडून होईल, अशी आशा आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्रायल दौऱ्यावर जाणार?

दरम्यान,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येत्या काही दिवसांत इस्रायलच्या दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहेत. दौऱ्याची योजना अद्याप निश्चित झालेली नसली तरी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बायडन यांना solidarity visit साठी आमंत्रित केले आहे, त्यामुळे ते इस्रायलला जाण्याची शक्यता आहे.

गाझापट्टीवर मानवतावादी संकटे

युद्धामुळे गाझामध्ये गंभीर मानवतावादी संकटे निर्माण झाली आहेत. रुग्णालये जखमींनी खचाखच भरलेली आहे. तर, इंधन आणि इतर मुलभूत पुरवठ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. इस्रायलने गाझावरील वीज, इंधन, अन्न, वस्तू आणि पाणीपुरवठा खंडित केला आहे.

मृतांची संख्या वाढली

इस्रायल-हमास युद्धात मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून सोमवारी मृतांची संख्या ४ हजारच्या वर गेली आहे. इस्रायलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की हमासच्या हल्ल्यात १४०० हून अधिक लोक मारले गेले, तर गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की इस्रायली क्षेपणास्र आणि गोळीबारात २६७० पॅलेस्टिनी ठार झाले आणि ९६०० जण जखमी झाले.