भाजपा गुजरातच्या प्रत्येक कुटुंबाचा भाग आहे. गुजरातमध्ये यंदा एक कोटीपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं. ज्यांनी कधीच काँग्रेसला सरकारला पाहिलं नाही. त्यांनी फक्त भाजपाच्या सरकारला पाहिलं. तरुण विचार करून मतदान करतात. सरकारचं काम प्रत्यक्ष नजरेला येत, तेव्हा मतदान केलं जातं. त्यामुळे यावेळी तरुणांनी सर्वाधिक भाजपाला मतदान केलं. याचा अर्थ तरुणांनी आमच्या कामाची पारख केली असून, विश्वास ठेवला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
गुजरात निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले, “करोना संकटात बिहारमध्ये निवडणूक झाली. तेव्हा जनतेने भाजपाला भरपूर प्रतिसाद दिला. आसाम, गोवा, उत्तर प्रदेश, मणिपूर या निवडणुकांत जनतेने भाजपाला कौल दिला. देशातील जनतेचा विश्वास फक्त भाजपावर आहे.”
हेही वाचा : “गुजरातच्या जनतेने ‘रेकॉर्ड’चा ‘रेकॉर्ड’ तोडून नवा इतिहास रचला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
“गुजरात निवडणुकीत भाजपाचं आवाहन होतं की, विकसित गुजरातपासून विकसित भारताचे निर्माण करायचं. आजच्या गुजरातच्या निकालाने सिद्ध केलं, जनतेला भारताच्या विकासासाठी किती प्रबळ आकांक्षा आहे. देशासमोर जेव्हा आव्हान असते, तेव्हा जनतेचा भाजपावर विश्वास असता. जेव्हा देश मोठं लक्ष्य निश्वित करतो, तेव्हा देशवासियांचा विश्वास हा भाजपावर असतो,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.