पॅलेस्टिनच्या सरकारने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला आहे. त्या दिवशीच्या इस्रायलवरील हल्ल्यात हमासचा सहभाग नव्हता, तर हा हल्ला इस्रायलनेच घडवून आणला, असा आरोप पॅलेस्टिनने केला आहे. याबाबत पॅलेस्टिनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं आहे. यात त्यांनी इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्याचं समर्थन करण्यासाठी इस्रायलवर हल्ला केल्याचा आभास निर्माण केला आणि त्यासाठी माध्यमांना माहिती पुरवली, असा आरोप पॅलेस्टिनने केला.

द टाईम्स ऑफ इस्रायल वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पॅलेस्टिनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं, “इस्रायलने त्यांच्यावर हल्ल्याचा बनाव केला. ७ ऑक्टोबरला सुपरनोव्हा म्युझिक फेस्टिवल सुरू असताना इस्रायलच्या हेलिकॉप्टरनेच इस्रायलच्या नागरिकांवर बॉम्बहल्ला केला. तसेच अशी बनावट माहिती माध्यमांना पुरवली.”

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
flights affected by bomb threat
वाढत्या विमान धमक्यांचा ५१० उड्डाणांवर परिणाम…धमकीखोरांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना? किती परिणामकारक?
Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिमांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाला…

पॅलेस्टिनच्या भूमिकेवर इस्रायचे पंतप्रधान आक्रमक, इशारा देत म्हणाले…

पॅलेस्टिनने हे निवदेन जाही करताच बेंजामिन नेतान्याहू आक्रमक झाले. ते म्हणाले, “मी हे अगदी स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही हमासचा खात्मा केल्यानंतर गाझात जे प्रशासन चालवत आहेत त्यांना आम्ही दहशतवादाला पाठिंबा देऊ देणार नाही.”

हेही वाचा : इस्रायलचे संयुक्त राष्ट्रावर गंभीर आरोप, राजदूत म्हणाले, “त्यांच्यामुळे हमासने…”

“आम्ही हमासचा पराभव केल्यानंतर गाझात…”

“सध्या पॅलेस्टिनचं स्थानिक प्रशासन दहशतवादी कृत्य होत असल्याला नकार देतं, दहशतवाद्यांना पाठिंबा देतं, दहशतवाद्यांच्या मुलांना दहशतवादासाठी आणि इस्रायलला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशिक्षित करतं. आम्ही हमासचा पराभव केल्यानंतर गाझात हे होऊ देणार नाही,” असा इशारा बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला.

हेही वाचा : हमासच्या खात्म्यानंतर गाझाचं सरकार कोण चालवणार? इस्रायलच्या राजदुतांचं मोठं विधान, म्हणाले…

“पॅलेस्टिनच्या परराष्ट्र खात्याकडून धक्कादायक दावे”

“पॅलेस्टिनचं परराष्ट्र खातं धक्कादायक दावे करत आहे. यात ते इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात हमासचा सहभाग नसल्याचा दावा करत आहेत. पॅलेस्टिनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांनीही इस्रायलवरील हल्ल्यात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केला आहे. युद्धाला ४४ दिवस दिवस झाले, तरीही पॅलेस्टिनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास (अबू माझेन) इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध करण्यास नकार देत आहेत. नरसंहार झाला नसल्याचा दावा करणारे अब्बास हमास-आयसिसने नरसंहार केला नसल्याचा दावा करत आहेत,” असंही नेतान्याहू यांनी नमूद केलं.