राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांच्या निलंबनाचं निलंबन करण्यात आलं आहे. दोन खासदारांमध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे. याशिवाय एस आर कोलहली यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीने एकूण ८ ठराव मंजूर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, “एक गोष्ट खरी आहे की, २०१९ मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचं एक पत्र दिलं होतं. त्यात पक्षाचं पुढील धोरण काय असावं, कुणाबरोबर युती करावी यावर चर्चा करण्याची गरज आहे, असं म्हटलं. त्यावर मी बैठक बोलावं असं म्हटलं होतं. मात्र, नंतर पुढे निवडणूक आली आणि त्यावर काहीही चर्चा झाली नाही.”

व्हिडीओ पाहा :

“मला पूर्ण विश्वास आहे की, २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल. आज जे सत्तेत आहेत त्यांना लोक दूर करतील. राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “शरद पवारांना कुटुंबातही वारंवार खोटं बोलावं लागलं, म्हणजे…”, अजित पवारांचा उल्लेख करत भाजपाचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत मंजूर करण्यात आलेले ८ ठराव

“त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल”

“जे महाराष्ट्रात सुरू आहे त्याबाबत मला आनंद आहे की, याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना मोजावी लागेल. राज्यातील सत्तेत बदल होतील आणि जनता राष्ट्रवादी, काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या हातात सत्ता देतील,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big eight resolution in ncp meeting in delhi in presence of sharad pawar pbs
Show comments