Suicide : एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका माणसाने त्याचं आयुष्य संपवलं आहे. तरुण सक्सेना असं त्याचं नाव आहे. तरुण सक्सेनाने त्याच्या सुसाईड नोटमध्ये हे लिहिलं आहे की कामाचा अतिताण, टार्गेट्स पूर्ण करण्याचं प्रेशर पगार कपात आणि सतत कामावरुन काढून टाकण्याची कंपनीतून मिळणारी धमकी या सगळ्याचा ताण सहन न झाल्याने मी आत्महत्या करतो आहे. याबाबत अद्याप बड्या फायनान्स कंपनीने काहीही भाष्य केलेलं नाही.

नेमकं काय घडलं?

तरुण सक्सेना हा झाशी मध्ये राहतो. त्याच्या घरात रविवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या पत्नीने त्याचा मृतदेह पाहिला. तरुणच्या घरातील दुसऱ्या खोलीत त्याची पत्नी आणि दोन मुलं होती. अशी माहिती काम करणाऱ्या व्यक्तीने दिली. तसंच तरुणने आत्महत्येपूर्वी पाच पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्याने कामाचा ताण, फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते गोळा करण्यासाठीचा तगादा, कमी वेळात जास्त काम करण्याचं टार्गेट या सगळ्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. तसंच नोकरी गमावण्याचीही भीतीही त्याने व्यक्त केली आहे. माझे वरिष्ठ मला सतत दबावाखाली ठेवत असत आणि काम कधी पूर्ण करणार याचा जाब विचारत असत. मी भविष्याच्या चिंतेने ग्रासलो होतो, त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे, त्यामुळे मी जग सोडून निघून जात आहे असं तरुणने म्हटलं आहे.

Three Walking yoga types to Include in Your Morning Walk – Viral Video
तुम्ही दररोज मॉर्निंग वॉकला जाता? हे तीन प्रकार करा चालण्यात समाविष्ट, VIDEO एकदा पाहाच
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
pune employee stress death
पुण्यातील तरुणीचा मृत्यू कामाच्या ताणामुळे? जास्त कामाचा तिच्या प्रकृतीवर कसा परिणाम झाला? किती टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना कामाचा ताण?
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Piyush Chawla response to Prithvi Shaw his retirement
Piyush Chawla : ‘तुझ्या मुलाबरोबरही खेळेन…’, पीयुष चावलाने आपल्या निवृत्तीबद्दल सांगताना पृथ्वी शॉची दिलं प्रत्युत्तर
Python
Python in Chandrapur : बटाटाच्या पेटीत वेटोळे घालून बसला होता भलामोठा अजगर, कर्मचाऱ्याने पेटी उघडताच…
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
kondhwa police arrested robbers
पुणे: कोंढव्यात दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड; तीक्ष्ण शस्त्रे, दुचाकी जप्त

हे पण वाचा- मुंबई : अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून समुद्रात मारली उडी, शोधमोहिम सुरू

तरुणने सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?

तरुणने त्याच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की त्याचे वरिष्ठ सांगत होते ज्या लोकांनी कर्ज घेतलं आहे त्यांचे हप्ते गोळा करुन आणू शकत नसशील तर तू ते पैसे फेड. तरुणने त्यांना काय समस्या येत आहेत ते सांगितलं होतं पण वरिष्ठांनी मुळीच ऐकून घेतलं नाही. मी जवळपास मागचे ४० दिवस नीट झोपूही शकलेलो नाही. मी प्रचंड तणावाखाली आणि टेन्शनमध्ये आहे. मी नीट जेवणही करु शकलेलो नाही इतका त्रास मला माझ्या वरिष्ठांनी दिला. माझे सिनीयर्स मला सतत टार्गेट देत होते ती अशीच होती जी पूर्ण होणार नाहीत. असंही तरुणने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

अद्याप FIR नाही

या प्रकरणात अद्याप FIR नोंदवण्यात आलेली नाही. शवविच्छेदनाच्या अहवालात गळफास लागल्याने मृत्यू असं म्हटलं आहे. पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अद्याप कुटुंबानेही कंपनीच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही. या प्रकरणात समोर आलेली माहिती अशी आहे की एक ऑनलाइन मिटिंग पार पडली. त्या मिटिंगनंतर या मॅनेजरने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.

तरुणने कुटुंबाला उद्देशून काय म्हटलं आहे?

तरुणने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की मी मुलांच्या शाळेची वर्षभराची फी भरली आहे. तसंच कुटुंबाला सोडून जाताना वाईट वाटतं आहे. मेघा, तू यथार्थ आणि पिहू यांची काळजी घे. तसंच माझ्या आई बाबांचीही काळजी घे. मी आजवर तुला काहीही मागितलं नाही हे शेवटचं मागणं मागतो आहे. तसंच तरुणने त्याच्या मुलांना उद्देशून हे लिहिलं आहे की तुम्ही दोघंही मेघाची काळजी घ्या. ज्या वरिष्ठांकडून त्याला त्रास होत होता त्यांचीही नावं तरुणने लिहिली आहेत. तरुणचा भाऊ गौरव सक्सेना हा त्याच्या शेजारीच राहतो. त्याने हे सांगितलं की तरुण गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली होता. या प्रकरणात पोलिसांनी म्हटलं आहे की आम्हाला तरुणची सुसाईड नोट मिळाली आहे. आम्ही या प्रकरणी कारवाई करत आहोत. बड्या फायनान्स या कंपनीकडून याबाबत काहीही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेलं नाही. या प्रकरणात पुढे काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.