दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या दहशतवादी चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक कर्नल, एक मेजर आणि एक पोलीस उपअधिक्षक शहीद झाले आहेत. १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष डोनचक आणि पोलीस उपअधीक्षक हिमायून मुझमिल भट अशी मृत अधिकाऱ्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल जंगलात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जम्मू – काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाई सुरू केली. बुधवारी सकाळी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालील सर्च ऑपरेशनदरम्यान जोरदार गोळीबार झाला, त्यात तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. त्यांना विमानाने श्रीनगरला नेण्यात आले. परंतु, तिथे त्यांचा मृत्यू झाला. यात कोणत्याही अतिरेक्याच्या मृत्यूचे वृत्त नाही.

या चकमकीप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त पथक घनदाट जंगलातून जात असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुरुवातीला जे स्फोट आणि गोळीबार झाले त्यातच तिघांचा मृत्यू झाला. गोळीबार इतका तीव्र होता की संयुक्त पथकाला प्रतिक्रिया देण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. दहशतवाद्यांनी सतत गोळीबार केला, ज्यामुळे जखमी अधिकाऱ्यांना लवकर बाहेर काढण्यात अडथळा निर्माण झाला.”

सिख लाइट इन्फंट्रीचे अधिकारी मनप्रीत सिंग हे कोकरनाग येथील १९ राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्व करत होते. २०२१ मध्ये त्यांना सेना पदक मिळाले होते. तर, हिमायून मुझमिल भट हे २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांत दाखल झाले होते. जम्मू काश्मीरचे निवृत्त महानिरिक्षक गुलाम हसन भट यांचे ते सुपूत्र होते.

दक्षिण काश्मीरमध्ये गेल्या महिनाभरातील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. ४ ऑगस्ट रोजी कुलगामच्या जंगलात अतिरेक्यांनी तात्पुरत्या लष्कराच्या चौकीला लक्ष्य केल्याने तीन जवान शहीद झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big news indiscriminate firing by terrorists in jammu and kashmir colonel major and dsp martyred sgk
Show comments