देशातील करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. करोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत असतानाच्या काळातच देशात पहिली विधानसभा निवडणूक बिहारमध्ये होत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला. करोना काळात होणाऱ्या निवडणुकीची एकूण प्रक्रिया आयोगानं स्पष्ट केली असून, विशेष म्हणजे करोनाग्रस्त रुग्णांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आयोगानं खास व्यवस्था केली जाणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, तीन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबर पहिल्या टप्प्यातील, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात व ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. करोना पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक होत असून, केंद्रीय निवडणूक आयोगानं करोना रुग्णांना मतदानापासून राहावं लागू नये म्हणून विशेष व्यवस्था केली आहे.
आणखी वाचा- बिहार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; १० नोव्हेंबरला लागणार निकाल
करोना रुग्ण ज्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
#COVID19 patients who’re quarantined will be able to cast their vote on the last day of poll, at their respective polling stations, under the supervision of health authorities. This is beside the option of postal facility already extended to them: CEC Sunil Arora. #BiharElections pic.twitter.com/zIvaSyGjH0
— ANI (@ANI) September 25, 2020
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले,”करोनामुळे एका मतदान केंद्रावर केवळ एक हजार मतदारच असणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व काळजी घेण्यात आली आहे. सात लाख सॅनिटायजर्स, सहा लाख पीपीई किट, साडे सहा लाख पेस शिल्ड, २३ लाख हॅण्ड ग्लोव्हज आणि ४७ लाख मास्कची व्यवस्था कऱण्यात आली,” असल्याची माहिती अरोरा यांनी दिली.