पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढील वर्षी बिहार विधानसभेची होत असलेली निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ लढविणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी दिली. ते भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करीत होते.

दरम्यान, निवडणुकीत नितीशकुमार यांना नेतेपदी नियुक्ती करण्याबाबत रालोआ पुनर्विचार करू शकतो का या प्रश्नाला उत्तर देताना यात कोणतेही दुमत नसल्याचे चौधरी म्हणाले. २४३ सदस्यसंख्या असलेल्या बिहार विधानसभेची निवडणूक २०२५ च्या अखेरीस होणार आहे.

हेही वाचा >>>“दिल्लीच्या निवडणुकीत आप जिंकली तरी केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत”, काँग्रेसचा दावा; कारण सांगत म्हणाले…

शहा यांच्या रणनीतीकडे लक्ष

भाजपचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रमुख रणनीतीकार असलेले विद्यामान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिहार विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या भाष्यामुळे चलबिचल वाढली होती. बिहारमध्ये रालोआ मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न करताच निवडणूक लढवेल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ‘आम्ही एकत्र बसून विचार करू आणि निर्णय घेऊ’ असे मोघम उत्तर शहा यांनी दिले होते. या उत्तरामुळे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाबाबत पुनर्विचार होऊशकतो, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे राज्यात भाजपचे संख्याबळ जास्त असतानाही मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांच्याकडे आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न करताच भाजपने अभूतपूर्व यश मिळवीत सत्ता काबीज केली आहे.

२०२० मध्ये नितीश कुमार यांना रालोआचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करून निवडणूक लढविली आणि आजवर तेच रालोआचे नेते आहेत. भविष्यातही आम्ही नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवू. सम्राट चौधरी, उपमुख्यमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar assembly elections will be held under the leadership of nitish kumar modi information from deputy chief minister samrat chaudhary amy