Bihar Assembly Ruckus : बिहार विधानसभेच्या प्रश्नोत्तरावेळी आज (१४ मार्च) मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधाऱ्यांकडून शिवीगाळ झाल्याचा आरोप केला जात आहे. तर प्रश्न विचारणाऱ्या भाजपा आमदार लखेंद्र कुमार रोशन यांनी माईक तोडला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष समोरा-समोर आले. माईक तोडल्याच्या घटनेनंतर भाजपा आमदार लखेंद्र कुमार रोशन म्हणाले की, माईक तोडला नव्हता तर तो केवळ उघडला गेला.

रोशन यांनी माईक तोडल्यानंतर डाव्या आमदारांनी त्यांना शिवी दिली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या आमदारांनी एकमेकांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. भारतीय जनता पार्टीने बिहार विधानसभेचा अर्थसंकल्पीय अधिवेशनारम्यान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा उपस्थित केला आणि घोषणाबाजी केली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा

माईक तोडला नाही : भाजपा आमदाराचा दावा

भाजपा आमदार लखेंद्र कुमार रोशन यांनी विधानसभेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी माईक तोडला नाही, तो केवळ उघडला गेला होता. मी तो माईक ठिक करण्याचा प्रयत्न केला. तो मायक्रोफोन खाराब झाला आणि बंद झाला.

रोशन म्हणाले की, “आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. यादरम्यान, माझा माईक बंद झाला. मी विचारलं की, माइक बंद का झाला. त्यानंतर सत्यदेव राम (डावे विधायक) यांनी मला शिवी दिली. मी जेव्हा माइकला हात लावला तसा माइकचा वरचा भाग उघडला गेला. या माइकचा वरचा भाग आधीपासूनच उघडा होता.”

पाहा व्हिडीओ

हे ही वाचा >> दोन बायका, कोर्टाचा अजब निर्णय ऐका…! मध्य प्रदेशमधल्या न्यायालयाने सोडवलं दोन बायकांचं भांडण

विधानसभेत कशामुळे झाला गोंधळ?

दरम्यान, डावे आमदार सत्य देव राम म्हणाले की, “रोशन बोलत असताना मी माझ्या खुर्चीजवळ उभा होतो. अध्यक्षांनी दुसऱ्या एका सदस्याचं नाव पुकारलं होतं. त्यानंतर रोशन यांनी मायक्रोफोन तोडला.”

Story img Loader