भाजपसाठी स्टार प्रचारक असलेले नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील सभा रद्द करण्यामागे पक्षातील नेत्यांचाच हात असल्याचा आरोप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षातून गच्छंती होण्याच्या मार्गावर असलेल्या सिन्हा यांनी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर आरोप करून नवीन खळबळ उडवून दिली. शेवटच्या क्षणी मोदींच्या सभा रद्द करून लोकांपर्यंत चुकीचा संदेश पाठवला जात आहे का, असा सवाल सिन्हा यांनी ट्विटरवर उपस्थित केला. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये मोदींच्या अनेक सभा घेण्याचे ठरले असतानाही आयत्यावेळी यापैकी अनेक प्रचारसभा रद्द करण्यात आल्या. यासाठी स्थानिक पातळीवर हुकूमशहा म्हणून ओळखले जाणारे स्थानिक नेते जबाबदार आहेत, असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.

Story img Loader