बिहारच्या सत्ताधारी आघाडीत लवकरच फुट पडण्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य समन्वयक नंदकिशोर यादव आणि राज्याचे  उप-मुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी ‘जद(यू)’च्या प्रमुख नेत्याची बैठक सुरू असून या बैठकीमध्ये आघाडी विषयी चर्चा करण्यात येणार आहे. ‘जद(यू)’चे बिहार प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह आणि पक्षाचे बरेच प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत.
“आम्ही राज्याचे पदाधिकारी असून पंतप्रधान पदाविषयी बोलण्याचा अधिकार फक्त आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला आहे”, असे रालोआचे राज्य समन्वयक व राज्य रस्ते बांधकाम मंत्री नंदकिशोर यादव म्हणाले. यादव आणि उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांना शनिवारी सकाळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले होते.
“आमचे राष्ट्रीय नेते व राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी आणि इतर नेते तुमच्या सोबत व शरद यादव यांच्याशी राजकीय घडामोडींवर व पंतप्रधान पदाच्या उमेदवारांविषयी चर्चा करत आहेत. आमच्या अखत्यारीतील हा विषय नसल्यामुळे आम्ही बैठकीसाठी येण्याचा प्रश्नच येत नाही.”, असे रालोआचे राज्य समन्वयक नंदकिशोर यादव यांनी मी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना म्हटले असल्याचे सांगितले.
नरेंद्र मोदी २०१४ लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान पदाचे उमोदवार नाहीत अशी भाजपने घोषणा करावी अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली आहे.           

Story img Loader