Bihar Bridge Collapse : बिहारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पूल कोसळल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. आताही बिहारच्या सुलतानगंजमधील गंगा नदीवर असलेल्या एका पुलाचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. बिहारमध्ये या वर्षातील पूल कोसळल्याची ही १२ वी घटना आहे. त्यामुळे पूल बांधण्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात येत आहे.

सुलतानगंजमधील गंगा नदीवरील हा आगवाणी ते सुलतानगंज चौपदरी पूल आहे. मात्र, या पुलाचा काही भाग कोसळल्याची ही तिसरी घटना आहे. याआधी या पुलाची ३० एप्रिल २०२२ मध्ये या पुलाचा ५ क्रमांकाचा खांब कोसळल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुन्हा ४ मे २०२३ मध्ये या पुलाच्या काही खांबाचा भाग कोसळला होता. यानंतर आता पुन्हा एकदा सुलतानगंजमधील गंगा नदीवरील या चौपदरी पुलाचा काही भाग कोसळला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Dombivli railway station work
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट एक-ए वरील सरकता जिना, उतार वाट रेल्वे पुलाच्या कामासाठी बंद
challenges in infrastructure development in india
महाशक्तीचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एवढी ‘पडझड’ का होतेय?
pick up tempo fell in creek while being loaded into boat in Raigad
Video : रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला… घटना सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा : Sabarmati Express derails: साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे कानपूर स्थानकाजवळ रूळावरून घसरले; ट्रॅकवरील वस्तूमुळे अपघात

सुलतानगंजमधील हा चौपदरी पूल कोसळल्याच्या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, नदीचे पाणी अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या पुलाचा काही भाग कोसळल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या पूलाचं बांधकाम सुरु आहे. आता या पुलाचं बांधकाम पूर्ण करण्याची तारीख २०२६ पर्यंत आहे. या संपूर्ण पुलाचं १,७०० कोटींचं बजेट आहे. मात्र, अशा प्रकारे पुलाचं बांधकाम पूर्ण होण्याच्या आधीच पुलाचा काही भाग कोसळत असल्याच्या घटना घडल्यामुळे आता पुलाच्या बांधकामाबाबत विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याच्या सरकारचा हा प्रमुख प्रकल्प मानला जातो. अगुवानी-सुल्तानगंज पूल हा राज्याच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागांमधला एक महत्त्वाचा दुवा आहे. तसेच खगरिया, सहरसा, मधेपुरा आणि सुपौल या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या भागांना जोडणारा आहे. या पुलाचे बांधकाम गेल्या काही वर्षांपासून सुरु असले तरी अद्याप फक्त ४५ टक्केच पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे.