पाटणा : बिहारमध्ये राज्य सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या जातनिहाय सर्वेक्षणाला पाटणा उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. या सर्वेक्षणाविरोधात उच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश न्या. के विनोद चंद्रन आणि न्या. मधुरेश प्रसाद यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला तातडीने सर्वेक्षण थांबवण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे अंतिम निकाल येईपर्यंत आतापर्यंत संकलित झालेली माहिती कोणाबरोबरही सामायिक न करण्याची खबरदारी घेण्याचेही आदेश दिले.

यासंबंधी पुढील सुनावणी ३ जुलै रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या आक्षेपामध्ये तथ्य आहे असे सकृतदर्शनी आम्हाला वाटते असे खंडपीठाने स्पष्ट केले. संकलित विदा सुरक्षित राहील यासाठी राज्य सरकारला विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे असेही न्यायालयाने सांगितले. राज्याकडे संपूर्ण वैधानिक क्षमता नसताना, ते सर्वेक्षणाच्या आडून जातनिहाय जनगणना करायचा प्रयत्न करू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. जनगणना आणि सर्वेक्षण यामध्ये फरक आहे. जनगणना ही तथ्यांवर आधारित असते तर सर्वेक्षण मतावर आधारित असते असेही न्यायालयाने बजावले. सर्वेक्षणादरम्यान तृतीयपंथीयांना एक जात म्हणून एकत्र करताना त्यांची ओळख आणि अस्तित्व यावर तडजोड केली असा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान मांडला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणाच्या निर्णयाचा संदर्भ वापरला.

supreme court s detailed order on neet ug paper leak
 ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Kalyaninagar Porsche Accident,
पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, पोलीस आयुक्तांची न्यायालयाकडे मागणी
nagpur bench of bombay hc
नागपूर : ‘फॉरेन्सिक सायन्स’ विभागाच्या दुरवस्थेवर न्यायालयाची नाराजी, विचारले, गुन्हेगारांना शिक्षा कशी द्यायची?
what is right to be forgotten
विसरण्याच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; काय आहे हा अधिकार? त्याविषयी कायदा काय सांगतो?
Supreme Court to hear petitions related to election bonds today
देणग्या ताब्यात घेण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांसंबंधीच्या याचिकांवर आज सुनावणी
Big Win For Bangladesh Protesters Bangladesh top court scales back job quotas that sparked violent protests
आंदोलक विद्यार्थ्यांना यश! बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयाकडून बहुतांश नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द
Consensual sex cannot be termed rape merely because love wanes away Karnataka High Court
प्रेम कमी झालं म्हणून सहमतीचे शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाहीत : उच्च न्यायालय
The Madras High Court asked the Center what was the need to change the criminal laws
फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती?मद्रास उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल