बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज जदयूच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  जदयुच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने त्यांची निवड करण्यात आली. पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
शरद यादव यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष करण्यासाठी पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला होता. परंतु त्यांनी चौथ्यांदा पक्षाध्यक्ष होण्याला नकार दिला. शरद यादव यांनी सलग १० वर्षे पक्षाध्यक्षपद भूषविले होते. कार्यकाळातील मुदत संपल्यानंतर यादव यांनी पक्षाचा कार्यभार नितीश कुमारांकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या सूचनेनुसार नितीश यांची निवड करण्यात आली.

Story img Loader