लहान व्यापाऱयांनी काळाबाजार केला तर काही बिघडत नाही. त्यास गुन्हा म्हणता येणार नाही त्यामुळे व्यापाऱयांनी चिंता करण्याची गरज नाही असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी केले आहे. ते व्यापाऱयांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते.
ते म्हणाले की, धंद्यात फायदा व्हावा यासाठी लहान व्यापारी किरकोळ प्रमाणात काळाबाजार करत असतात याची मला जाणीव आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना हे करावे लागते. पण, काळजी करू नका अशा किरकोळ प्रमाणात काळाबाजार केल्याने तुम्हाला कोणी गुन्हेगार ठरवणार नाही अथवा राज्यसरकारही तुमच्यावर कोणती कारवाई करणार नाही. त्यामुळे निश्चिंत रहा.” असेही मांझी म्हणाले.
आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी लहान व्यापाऱयांनी किरकोळ प्रमाणात काळाबाजार केल्याने काही बिघडत नाही असे मांझी यांना वाटते.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून काळाबाजार करणाऱयांची पाठराखण
लहान व्यापाऱयांनी काळाबाजार केला तर काही बिघडत नाही. याला गुन्हा म्हणता येणार नाही त्यामुळे व्यापाऱयांनी चिंता करण्याची गरज नाही असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी केले आहे.
First published on: 03-09-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar cm defends black marketing says not a crime if done by small traders